आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: लाज-या स्वभावामुळे आईने नाटकात दिले होते काम,वाचा मुक्ताविषयी A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विलक्षण बोलके डोळे आणि सहज अभिनयाच्या जोरावर मुक्ता आज मराठी चित्रपट सृष्टीची आघाडीची अभिनेत्री बनली आहे. नाटक, चित्रपट आणि टी.वी या तिन्ही माध्यमांत यशस्वी अभिनय कारकिर्द घडविणारी मुक्ता ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. अशी सर्वाची लाडकी मुक्ता आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे.


मुक्ता बर्वे हे नाव जरी घेतले तर डोळ्यासमोर येते 'जोगवा'मधील सुली, 'एक डाव धोबीपछाड' चित्रपटातील अशोक सराफांची नटखट मुलगी, तितक्याच ताकदीने'मुंबई-पुणे-मुंबई' मधील स्वच्छंद, स्वतंत्र विचारांची मॉर्डन मुलगी. भूमिका कोणतीही असो शहरी मुलगी अथवा खेडवळ स्त्री. मुक्ताच्या अभिनयाने ती अक्षरशः त्या व्यक्तिरेखेत प्राणच फुंकते हे कोणीही नाकारणार नाही.


17 मे 1981 रोजी पुण्याजवळील चिंचवड गावात मुक्ताचा जन्म झाला. मुक्ताचे वडिलांचे नाव वसंत बर्वे तर आई विजया बर्वे नाट्यलेखिका आणि शिक्षिका. मुक्ताचा मोठा भाऊ देबू बर्वे हा कमर्शिअल आर्टिस्ट आहे.

 

15 वर्षाची असताना मुक्ताने केला नाटकात प्रवेश..

मुक्ता लहानपणापासून अतिशय लाजाळू आणि बुजऱ्या स्वभावाची. तिचा हा स्वभाव कमी व्हावा म्हणून नाट्यलेखिका असलेल्या मुक्ताच्या आईने ‘रुसू नका फुगू नका’ हे मराठी 
नाटक लिहीले आणि मुक्ताला यात अभिनय करण्यास दिला. यातील भित्रा ससा आणि परी राणी या दोन्ही भूमिका मुक्ताने केल्या. यानंतर मुक्ताने वयाच्या 15 व्या वर्षी रत्नाकर मतकरीं च्या 'घर तिघांचे हवे' या नाटकात काम केले. इ. १० वी च्या परीक्षेनंतर, टेल्को कंपनीच्या स्पर्धेसाठी बसवलेल्या नाटकांपैकी ते एक नाटक होते. 


पुढच्या स्लाईडवर पाहा, कशी आहे मुक्ताची चित्रपट कारकिर्द....

बातम्या आणखी आहेत...