Home | Gossip | Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

31 वर्षांची झाली 'दबंग' गर्ल, बघा शत्रुघ्न सिन्हांच्या लाडक्या लेकीचे Childhood Photos

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 02, 2018, 11:35 AM IST

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आज (2 जून) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  मुंबई -बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आज (2 जून) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 जून 1987 रोजी बिहारच्या पटना शहरात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी सोनाक्षीचा जन्म झाला. ती बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'शॉटगन' या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी धाकटी मुलगी आहे. सोनाक्षीसह शत्रुघ्न यांना दोन जुळी मुले असून लव आणि कुश ही त्यांची नावे आहेत.

  सोनाक्षीची आईदेखील आहे अभिनेत्री...
  सोनाक्षीच्या आईचे नाव पूनम सिन्हा आहे. पूनम सिन्हा यांनी 'जिगरी दोस्त'(1968), 'आदमी और इंसान'(1969), शैतान (1974), ड्रीम गर्ल' (1977) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये काम केले आहे. सोनाक्षीच्या कुटुंबात एक नवीन सदस्य दाखल झाला आहे. ती व्यक्ती आहे सोनाक्षीची वहिनी आणि तिचा भाऊ कुशची पत्नी तरुणा अग्रवाल.

  फॅशनच्या दुनियेत आजमावले नशीब...

  - सोनाक्षीने तिचे शालेय शिक्षण आर्य विद्या मंदिर, मुंबई येथून पूर्ण केले. तर SNDT युनिव्हर्सिटीतून तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला.
  - 2005 मध्ये आलेल्या 'मेरा दिल लेके देखो' या चित्रपटाद्वारे सोनाक्षीने कॉश्च्युम डिझायनर म्हणून करिअरची सुरुवात केली. 2008 ते 2009 याकाळात ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करताना दिसली होती.
  - 2010 मध्ये सोनाक्षी चित्रपटांकडे वळली. आतापर्यंत सोनाक्षीने 'दबंग', 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग-2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', 'आर राजकुमार' 'हॉलिडे: अ सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी', 'अॅक्शन जॅक्शन', 'तेवर', 'अकीरा' आणि 'फोर्स-2' या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

  - दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह 'लिंगा' या सिनेमातसुद्धा सोनाक्षी झळकली आहे.

  'दबंग 3'साठी कमी केले 35 किलोंहून अधिक वजन...

  बॉलिवूडमध्ये करियर सुरु करण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन तब्बल 90 किलो होते. 2010 मध्ये तिला सलमान स्टारर 'दबंग' चित्रपटाची ऑफर मिळाली, त्यानंतर सोनाक्षीने तिचे तब्बल 30 किलो वजन कमी केले होते. सोनाक्षी आता लवकरच 'दबंग 3' या चित्रपटात झळकणार असून ती वर्कआउटमुळे पुर्वीपेक्षा स्लिमट्रीम झाली आहे. ती दररोज जिममध्ये वर्कआऊट करते आणि लिमिटेड डाएट घेते. असे करुन तिने आतापर्यंत 35 किलोंहून अधिक वजन कमी केले आहे.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनाक्षीचे बालपणीपासून आतापर्यंतचे PHOTOS...

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  शत्रुघ्न सिन्हा यांच्या हातात चिमुकली सोनाक्षी, सोबत तिचे जुळे भाऊ लव-कुश आणि आई पूनम सिन्हा. 

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  पुनम सिन्हा यांच्या हातात चिमुकली सोनाक्षी, सोबत तिचे वडील आणि भाऊ लव-कुश

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत सोनाक्षी

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  आईवडिलांसोबत सोनाक्षी सिन्हा

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत सोनाक्षी

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  चिमुकली सोनाक्षी

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  शालेय जीवनातील सोनाक्षीचे छायाचित्र.

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  वडिलांसोबत सोनाक्षी 

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  पुनम सिन्हा यांच्यासोबत चिमुकली सोनाक्षी, सोबत तिचे वडील आणि भाऊ लव-कुश

 • Birthday Special : Sonakshi Sinha Turn 31 Today

  जुळे भाऊ लव-कुश आणि वडिलांसोबत सोनाक्षी. 

Trending