आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tellyworld:'गुलमोहर'मधील आगामी कथेत आजी-आजोबांच्या घरात बोक्या करणार उपदव्याप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहरमधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. सध्या गुलमोहर मालिकेच्या काही भागात बोक्या सातबंडे या ९०च्या दशकातील मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेच्या मनोरंजक कथा सादर केल्या जाणार आहेत. आगामी कथेत बोक्या हा त्याच्या समोरच्या घरात राहणाऱ्या बेलवंडी आजी आजोबांच्या चाऱ्यावर हसू उमटवणार आहे.

बोक्याच्या सोसायटीत बेलवंडी आजीआजोबा राहतात. एकदा काही कारणाने बोक्या त्यांच्या घरी गेला. तेव्हा त्याला थोडीशी उदासीनता जाणवली.

 

आजीआजोबा आपल्या आपल्यातच राहत.काहीनकाही कारणाने बोक्याचं त्या घरात जाणं वाढू लागलं. हळूहळू बोक्या आणि त्यांच्यात मैत्री होऊ लागली. बोक्याला हेसुद्धा समजलं की त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे.त्यांना एक नातूसुद्धा आहे.आजीआजोबा त्याची वाट बघत आहेत.पण तो काही केल्या इथे येत नाही आहेत आणि अशातच एक दिवस आजोबांच्या मुलाचं त्यांना पत्र येतं आणि बोक्याच त्यांना ते वाचून दाखवायला सुरु करतो.पण पूर्ण वाचत नाही.कारण त्यात असं लिहिलंय की तो मुलगा आणि नातू कधीही इथे येणार नाहीत. हे कळल तर आजीआजोबांना खूप वाईट वाटेल.म्हणून बोक्या गप्प राहतो.तो आजीआजोबांना सांगतो की तुमचा नातू तुम्हाला भेटायला येणार आहे. आजीआजोबा खूप खूष होतात आणि त्यानंतर बोक्या हा आपल्या दादाला त्यांचा नातू बनायला सांगतो.दादा कसाबसा तयार होतो आणि आजी आजोबांच्या  घरी जातो. दोघंही खूष होतात आणि हयाच दरम्यान बोक्याचे बाबा काही कामा-निमित्त बेलवंडी आजीआजोबांच्या घरी जातात. आजीआजोबा त्यांना आपल्या नातवाविषयी सांगतात.दादाची कोंडी होते आणि तो आतल्या खोलीत लपून बसतो.

बातम्या आणखी आहेत...