आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात हिट वाढवतेय हिंदी अभिनेत्री नेहा खान, \'शिकारी\'मध्ये आहे फारच बोल्ड अवतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटातील आजवरचे सर्वात बोल्ड पोस्टर असलेला 'शिकारी' चित्रपटाचे गाणे 'शहारलेल्या मनात' हे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्यात अभिनेता सुव्रत जोशी आणि नेहा खान यांचा बोल्ड अंदाज दिसतोय. 

 

गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक विजू माने यांनी एक बोल्ड पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते तेव्हा त्या चित्रपटाचे नाव समोर आले नव्हते. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका तरुणीचे केवळ पाय दाखवण्यात आले होते. यानंतर इतके बोल्ड पोझ देणारी ही तरुणी आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता तर या तरुणीचे नाव आहे नेहा खान. नेहा खान शिकारी या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वार ती मराठीत डेब्यू करत आहे.

 

नेहा खानविषयी...
नेहाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता तीने मराठीअगोदर हिंदी तसेच मल्याळम चित्रपटात काम केले आहे. नेहाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता तीने शाहरुख खानसोबतही एका कमर्शिअलमध्ये काम केल्याचे समजते.  

 

अशी आहे स्टारकास्ट..

नेहा खानसह 'शिकारी' या मराठी चित्रपटात काश्मिरा शाह, प्रसाद ओक, सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे आणि भाऊ कदम यांच्या भूमिका असल्याचे समजते. या चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. हा चित्रपट येत्या 20 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, नेहा खानचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...