आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Bucket List Actor Sumeet Raghvan Interview सुमीतला असा मिळाला माधुरीसोबतचा ड्रीम प्रोजेक्ट, ही आहे त्याची 'बकेटलिस्ट'

INTERVIEW : सुमीतला असा मिळाला माधुरीसोबतचा ड्रीम प्रोजेक्ट, ही आहे त्याची 'बकेटलिस्ट'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थातच माधुरी दीक्षितचा पहिलावहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या चित्रपटात माधुरीने राधिका साने  नावाच्या गृहिणीची भूमिका वठवली आहे. तर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन या चित्रपटात माधुरीच्या नव-याच्या भूमिकेत आहे. माधुरीसोबत काम करण्याची   संधी मिळाल्याने स्वप्नपुर्ती झाल्याची भावना सुमीतने व्यक्त केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुमीतशी केलेली ही खास बातचित...

 

माधुरीचे नाव फायनल होण्यापूर्वीच सुमीतला मिळाली चित्रपटाची ऑफर... 
या चित्रपटासाठी माधुरी दीक्षितचे नाव फायनल होण्यापूर्वीच सुमीतला या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. याविषयी सुमीत सांगतो, चित्रपटाचे दिग्दर्शक तेजस देऊस्कर आणि मी एकाच जीममध्ये वर्कआऊट करायला जातो. दोघेही मुंबईत विले पार्ले  येथे वास्तव्याला आहेत. पण दोघांची फारशी ओळख नव्हती.  एकेदिवशी तेजसने फोन करुन मला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकवायची आहे, असे सांगितले. त्यानंतर आमची भेट झाली. तेजसने मला स्क्रिप्ट ऐकवली. स्क्रिप्ट मला आवडली. पण माझी भूमिका ही मुख्य भूमिका नव्हती. कारण चित्रपटाची पटकथा ही महिला क्रेंद्रित आहे. चित्रपटाची हीरो ही महिला आहे. त्या महिलेच्या नव-याची भूमिका होती. पण ही मुख्य भूमिका कोण साकारणार हे त्यावेळी ठरले नव्हते. मी तेजसला चित्रपटातील अभिनेत्री कोण असे विचारल्यावर त्याने मला दोन-तीन दिवसांत नाव सांगतो, असे सांगितले. पण त्यावेळी चित्रपटाचा हीरो ही नायिका असल्याने भूमिकेसाठी नवोदित नव्हे तर एका मोठ्या नावाची गरज असल्याचे मत मी तेजसकडे व्यक्त केले होते. 


पुढे वाचा,  -माधुरीचे नाव समजताच आले होते थोडे सुमीतला दडपण...
- ... तर लोक म्हणाले असते सुमीतने का स्वीकारला हा चित्रपट 
- सेटवर असायचे धमाल-मस्तीचे वातावरण...
- फर्स्ट डे फर्स्ट शो बघता येणार नसल्याची व्यक्त केली खंत... यासह बरंच काही... 

बातम्या आणखी आहेत...