आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शाहरुखच्या 'स्वदेस' चित्रपटातील साधाभोळा आणि लोभस चेहरा असलेली अभिनेत्री आपल्याला नक्कीच आठवत असेल. मराठमोळ्या गायत्री जोशीने या चित्रपटात शाहरुखसोबत डेब्यू केला होता. 20 मार्च 1974 साली जन्मलेल्या गायत्रीने नुकताच तिचा 44वा वाढदिवस साजरा केला. केवळ एकाच चित्रपटात काम करुन ती चित्रपटसृष्टीतून गायब झाली. गायत्रीने बिझनेसमन विवेक ओबेरॉयसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडून आता सांभाळतेय कोट्यवधींचा व्यवसाय...
अब्जाधीश आहे गायत्रीचा पती विकास ओबेरॉय..
- विकास ओबेरॉयचे नाव जगभरात रिअल इस्टेट टायकून म्हणून प्रसिद्ध आहे. विकास मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतात.
- मिळालेल्या माहितीनुसार, 46 वर्षीय विकास ओबेरॉय यांची 1.6 अब्ज डॉलर म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त मालमत्ता आहे.
- गायत्रीही पतीच्या बिझनेसमध्ये जातीने लक्ष देते आणि आता तीसुद्धा बिझनेसवुमन बनली आहे.
- ओबेरॉय इंडस्ट्रीमध्ये गायत्रीचेही शेअर्स आहेत. गायत्री विकास ओबेरॉय यांच्यासोबत बिझनेस मिटींगमध्येही जाते.
देशभरात आहेत अनेक प्रोजेक्ट...
- विकास ओबेरॉय 'ओबेरॉय रियलिटी'चे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांचे मुंबईमध्ये 40 हून जास्त कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट आहेत.
- मुंबईशिवाय गोव्यामध्येही त्यांचे अनेक प्रोजेक्ट आहेत.
- विकास यांचे शिक्षण लंडनमधील हॉवर्ड युनिवर्सिटीमधून झाले आहे.
लग्नानंतर चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम..
- विकास आणि गायत्री यांचे लग्न 2005 साली लास वेगासमध्ये झाले आहे. लग्नानंतर गायत्रीने एकाही चित्रपटात काम केले नाही.
- विकास आणि गायत्री या दोघांना दोन मुली आहेत. पहिल्या मुलीचा जन्म 1 सप्टेंबर 2006 साली तर दुसऱ्या मुलीचा जन्म 2010 साली झाला.
शाहरुखसोबत गायत्रीने केले आहे काम..
- गायत्रीने 1999 साली फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. शेवटच्या पाच स्पर्धकांपैकी ती एक होती.
- 2000 साली जापान येथे झालेल्या मिस इंटरनॅशनल इवेंटमध्ये गायत्रीने भारताचे प्रतिनीधीत्व केले होते.
- 2004 साली गायत्रीने आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेस' या चित्रपटात शाहरुख खानसोबत काम केले.
- 'स्वदेस' चित्रपटात गायत्रीने टीचरची भूमिका केली होती.
पुढच्या स्लाईडवर पाहा, गायत्री आणि विकास यांचे काही खास PHOTOS...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.