आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खऱ्या आयुष्यात 'या' अभिनेत्याला डेट करतेय सखी गोखले, 'बॉयफ्रेंड'ने म्हटले आहे I love Her!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत अभिनेता मोहन गोखले यांची मुलगी सखी गोखलेने तिच्या अदाकारीने आणि लुक्सने अल्पावधीत प्रेक्षकांचे मन जिंकले. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतुन कॉलेजवयीन मुलीची भूमिका तिने केली. या मालिकेत अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, पियुष चिपळुणकर, स्वानंदी टीकेकर, सुव्रत जोशी यांसारख्या तरुण कलाकारांनीही भूमिका केली. मालिकेतील नावाप्रमाणेच या सर्वांची छान गट्टी सेटवर जमली. पण त्यातील एका व्यक्तीचे सखीसोबतचे फोटो बघून प्रेक्षकांना शंका आली आणि सखी ती व्यक्ती एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

 

तर ती व्यक्ती आहे सुव्रत जोशी. सुव्रत सध्या 'डान्स महाराष्ट्र डान्स'चे होस्टींग करत आहेत. आपण सुव्रतचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले असता त्यात सुव्रत आणि सखीचे अनेक फोटोज् आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे हे फोटो पाहिले असता कोणालाही ते रिलेशनशीपमध्ये असल्याची खात्री पटते. सुव्रतने सखीचा एक फोटो शेअर करत त्यावर I love Her असे म्हणत तिचे कौतुक करणारे स्टेटस तिच्यासाठी खास लिहीले होते. यावरुन हे दोघे त्यांचे रिलेशनशीप उघडपणे बोलतजरी नसले तरी ते लपवतही नाही हेच समजते. इतकेच नव्हे तर सुव्रत सखीची आई शुभांगी गोखले यांच्यासोबतही छान बाँडींग शेअर करतो.

 

पुढच्या स्लाईडनवर पाहा, सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांचे सोबतचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...