आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Holi : रंगांची उधळण न करता साजरा होतो जुईच्या घरी रंगपंचमीचा सण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पुढचं पाऊल' या मालिकेत कल्याणी या व्यक्तिरेखेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी हिच्या घरी होळीच्या सणाचे आगळेवेगळे सेलिब्रेशन केले जाते. हे सेलिब्रेशन नेमके कसे असते, सांगतेय स्वतः जुई गडकरी...  

 

''होळी हा मी व माझ्या कुटुंबासाठी खास क्षण असतो. आम्हा गडकरी कुटुंबाचा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 100 वर्ष जुना वाडा आहे. तिथे दरवर्षी आम्ही होळीला जमतो. गडकरी कुटुंबातील आम्ही सारे जण जमून रात्री होळी पेटवतो. त्यावेळी रितसर होळीची पुजाही केली जाते. दुस-या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी आम्ही एकमेकांवर रंग उडवत नाही. तसे करणे आम्हाला आवडत नाही. सणाचे पावित्र्य जपले जावे हा त्यामागचा विचार असतो. त्याऐवजी आम्ही गडकरी कुटुंबीय रंगपंचमीच्या दिवशी दुपारी आमच्या वाड्यात एकत्र भोजन घेतो. त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे जेवण असते. हा एकप्रकारे आम्ही गडकरी लोकांनी परस्परांबरोबर व्यतित केलेला क्वालिटी टाइम असतो. सणांचे पावित्र्य राखायला हवे ते आम्ही आमच्या परीने राखायचा प्रयत्न करतो.''


पुढे वाचा, होळीच्या निमित्ताने जुईने सांगितलेला तिच्यासोबत घडलेला किस्सा..   

बातम्या आणखी आहेत...