आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, नव्या जोमात होणार शोची सुरूवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी ऑनलाईन- मराठीतील सुपरहीट कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. होय, अगदी नव्या ढंगात आणि नव्या जोमात हा कार्यक्रम पुन्हा एकदा झी टीव्हीच्या पडद्यावर अवतरून प्रेक्षकांना खळखळून हसवण्याच्या तयारीत आहे. खुद्द कुशल बद्रीके आणि श्रेया बुगडे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एका व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारीमध्ये शो सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे.


अतिशय कमी वेळेत निलेश साबळे आणि त्याच्या टीमने चला हवा येऊ द्या या क्रार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रसिद्ध हिंदी कॉमेडी शो ला टक्कर देत 'चला हवा येऊ द्या'ने अल्पावधीतच मराठीतील टीआरपीचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर काही दिवस बंद राहिल्यानंतर हा शो पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.


'चला हवा येऊ द्या'ची टीआरपी पाहून बॉलीवुडमधील शाहरूख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासारख्या आघाडीच्या अभिनेत्यांनाही या शोने भुरळ घातली. त्यामुळे आपल्या सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठी बॉलीवुडमधील अनेक सेलेब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली होती.


पुढील स्लाइडवर पाहा, चला हवा येऊ द्यामध्ये या बॉलीवुड कलाकारांनी लावली हजेरी...

बातम्या आणखी आहेत...