आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\' फेम श्रेयाचा Wedding Album, गुजराती तरुणासोबत महाराष्ट्रीय पद्धतीने थाटले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे सेठ हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची तिशी पूर्ण केली आहे. 2 फेब्रुवारी 1988 रोजी पुण्यात एका मराठी कुटुंबात जन्मलेली श्रेया गुजराती कुटुंबाची सून आहे. श्रेयाचे लग्न निखिल सेठसोबत झाले आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. महाराष्ट्रीय पद्धतीने श्रेयाचे गुजराती असलेल्या निखिलसोबत लग्न झाले होते. 

 

पहिल्याच भेटीत श्रेयाच्या प्रेमात पडला होता निखिल...
'बैरी पिया' या मालिकेत निखिलने श्रेयाला पहिल्यांदा बघितले होते. त्यानंतर मांडला दोन घडीचा डाव या मालिकेसाठी निखिलनेच श्रेयाचे नाव सुचवले होते. श्रेया आणि निखिलची पहिली भेट 2011 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात झाली होती. हे दोघेही 'मांडला दोन घडीचा डाव' या मालिकेत काम करत होते. श्रेयाची मालिकेत महत्त्वाची भूमिका होती. तर निखिल मालिकेच्या क्रिएटीव्ह टीमचा भाग होता. येथेच दोघेही पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीत उद्धट अशी निखिलची इमेज श्रेयासमोर उभी झाली होती. पण हळूहळू निखिल श्रेयाच्या मेकअप रुममध्ये येणे सुरु केले. तिथे आल्यानंतर निखिल श्रेयाची डायरी वाचायचा. त्यावेळी का हा मुलगा माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय, अशी श्रेयाची रिअॅक्शन होती. मालिका सुरु झाल्यानंतर पाच महिन्यांनी निखिलने ही मालिका सोडली. त्यानंतर दोघांचा काहीच संपर्क आला नाही. काही महिन्यांनी 'गुंतता हृदय ही' मालिका सुरु झाली. या मालिकेचा निखिल एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होता. मालिकेच्या नामावलीत निखिलचे नाव बघून श्रेयाने त्याला फोन केला आणि मालिकेचे प्रोमो छान झाले, अशी कॉम्प्लिमेंट दिली. त्यावेळी मालिकेचे पहिले शेड्युल संपले असून मी पुण्यात आलोय, असे निखिलने श्रेयाला सांगितले. या फोन कॉलनंतर हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याकाळात निखिलचे घरचे त्याच्या लग्नासाठी मुली शोधत होते. एकेदिवशी निखिलने श्रेया तू सिंगल आहेस का? असा प्रश्न विचारला. त्यावर श्रेयाने हो उत्तर दिल्यानंतर निखिलने तिला लग्नाची मागणी घातली आणि घरच्यांच्या सहमतीने दोघांचे लग्न झाले. निखिलचे हे लव्ह अॅट फर्स्ट साइट होते. तर श्रेयासाठी हे मुळीच लव्ह अॅट फर्स्ट साइट नव्हते.

 

 

मराठी इंडस्ट्रीतील सेलेब्सची होती हजेरी..

श्रेयाच्या लग्नाला मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेता पियुष रानडे श्रेयाचा मानलेला भाऊ आहे. तिच्या मेंदी, संगीत, हळदीपासून ते लग्न पाठवणीपर्यंतच्या सर्व विधींना पियुष हजर होता. शिवाय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत श्रेयाची अतिशय जीवाभावाची मैत्रीण आहे. तिच्या लग्नाच्या प्रत्येक विधीला तेजस्विनीनेसुद्धा उपस्थिती लावली होती. याशिवाय आनंद इंगळे, मृणाल दुसानिस, अभिज्ञा भावे, प्रिया मराठेसह अनेक सेलिब्रिटी श्रेया आणि निखिल यांना शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.  

 

आज श्रेयाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तिच्या फॅन्ससाठी घेऊन आलो आहोत, तिच्या लग्नाचा अल्बम... या अल्बममध्ये श्रेयाच्या मेंदी, हळदी, संगीत सेरेमनीपासून ते सप्तपदी आणि पाठवणीपर्यंतच्या छायाचित्रांचा समावेश आहे. श्रेयाच्या लग्नाचे हे फोटोज कदाचित यापूर्वी तुम्ही बघितले असतील..

बातम्या आणखी आहेत...