आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day:पर्यटनासोबतच शॉपिंगसाठीही crazy आहे श्रेया बुगडे, 30 व्या वाढदिवशी येथे जाऊन केले सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे आज तिचा तिसावा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. या खास दिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी श्रेया केरळमध्ये पोहोचली आहे आणि तिथून काही फोटोज् शेअर केले आहेत. यात तिचा मेकओव्हर लुक दिसत आहे. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचा स्टनिंग अंदाज दिसत आहे. 

 

'चला हवा येऊ द्या' शोचा सध्या जगभर दौरा सुरु आहे आणि त्यानिमित्त सर्वच टीम वेगवेगळ्या देशी फिरताना दिसत आहे. पण श्रेयाचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर आपल्याला कळून येईल की केवळ कामानिमित्तच नव्हे तर श्रेया तिचा पती आणि कुटुंबियांसहही जगभर प्रवास करताना दिसते. त्यासोबतच श्रेयाला शॉपिंग करण्याचीही प्रचंड आवड आहे. तिचे हे शॉपिंगप्रेम तिचे सहकलाकार आणि कुटुंबियही सांगतात. 

 

असे आहे कुटुंब..
श्रेयाचे आई, वडील आणि बहीण असे लहान कुटुंब आहे, श्रेयाने गुजराती तरुणासोबत प्रेमविवाह केला आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी निखिल आणि श्रेया विवाहबद्ध झाले. श्रेयाचे माहेर आणि सासर दोन्हीही पुण्यात आहे. महाराष्ट्रीय तसेच गुजराती पद्धतीने श्रेयाचे निखिलसोबत लग्न झाले आहे..

 

आज श्रेया बुगडेच्या वाढदिवसानिमित्त तिची Travel Diary खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.


पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...