आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: \'चला हवा येऊ द्या\' फेम श्रेया झाली 30 वर्षांची, हे आहेत तिचे फॅमिली-फ्रेंड्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाने निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे या विनोदवीरांना वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याच कार्यक्रमात एकमेव स्त्री पात्र आहे. हे पात्र साकारत आहे अभिनेत्री श्रेया बुगडे. खरं तर श्रेया छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा. अनेक मालिकांमध्ये श्रेयाने व्हिलन, सेकंड लीड रोल साकारले आहे. मात्र खलनायिका रंगवणारी श्रेया विनोदी अभिनयसुद्धा तितक्याच ताकदीने साकारु शकते हे 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून लोकांना कळले. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या श्रेयाचा आज वाढदिवस असून तिने वयाची 30 वर्षे पूर्ण केली आहेत. 

 

ज्याप्रमाणे इतर विनोदवीरांशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे श्रेयाशिवाय  'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम अर्धवट आहे. कधी खलनायिका, कधी भित्री तर कधी स्वावलंबी अशा अनेक व्यक्तिरेखा श्रेयाने साकारल्या. पण कॉमेडी शो करताना आपणही मनात आणलं तर उत्तम विनोदनिर्मिती करू शकतो हे तिने दाखवून दिले आहे. 


 2 फेब्रुवारी 1988 रोजी जन्मलेल्या श्रेयाविषयी जाणून घेऊयात... 
श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आठवीत असताना बाललैंगिक शोषणावर ‘वाटेवरच्या काचा गं’ हे छोटसे प्रबोधनपर नाटक केले होते. या नाटकाचे प्रयोग करण्याकरता श्रेया इतरांबरोबर सगळीकडे फिरली. शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयानं अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काहीतरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मराठीतच नाही तर गुजराथी नाटकांमध्येही काम केले आहे.त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू या मालिकांमध्ये ती झळकली आहे. 


विवाहित आहे श्रेया.. 
श्रेया 27 डिसेंबर 2015 ला लग्नगाठीत अडकली. निखिल सेठ हे तिच्या नव-याचे नाव. निखिलसुद्धा पुण्याचाच आहे. सासर-माहेर पुण्याचे असल्याने श्रेया खूश आहे.


आज श्रेयाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात तिची फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतची खास छायाचित्रे...

बातम्या आणखी आहेत...