आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: थुकरटवाडी दुमदुमणार विठ्ठलाच्या जयघोषाने, आषाढी एकादशीनिमित्त वारी विशेष भाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

 

येत्या सोमवार मंगळवारच्या भागात हजेरी लावणार आहेत गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि सारेगमप लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लघाटे. निमित्त आहे आषाढी एकादशीचे. या संगीतमय भागात अवघी थुकरटवाडी भक्तिमय होणार आहे. हास्यकल्लोळ सोबतच या आठवड्यात प्रेक्षकांना सुमधुर सुरांचा आस्वाद देखील घ्यायला मिळणार आहे. तसेच या भागात विनोदवीर 'पडोसन' या हिंदी चित्रपटाचे स्पूफ सादर करून प्रेक्षकांना हसायला भाग पडणार आहेत. चला हवा येऊ द्या च्या मंचावर यावेळी अनन्या नाटकाची टीम देखील उपस्थित होती तसेच मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार देखील या मंचावर सज्ज होते. हा भाग येत्या सोमवार आणि मंगळवारी २३ आणि २४ जुलै रात्री ९.३० वा. प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...