आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आमचा विश्वदौरा फसला, आता प्रेक्षकांच्या मर्जीप्रमाणे वागू\', \'चला हवा..\'च्या भाऊ-कुशलची कबुली!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून 'चला हवा येऊ द्या'चे विश्वदौऱ्याचे विशेष भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत पण यादरम्यान कलाकारांच्या कामाचा दर्जा आणि विनोदनिर्मिती हवी तशी होत नाही, अशी ओरड सर्वांकडून होत होती. अखेर शोमधील कलाकारांनाही त्यांची चुक कळाली आहे आणि त्यांनी यानिमित्त प्रेक्षकांशी संवाद साधला. नुकत्याच एका मुलाखतीत भाऊ कदम आणि कुशल बद्रीके यांनी त्यांची चुक कबुल केली आणि आमच्यावर प्रेम करत रहा तसेच पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा अशी आर्त विनंती केली. काय म्हटले अजून भाऊ-कुशल...

 

शोची लोकप्रियता कमी झाली त्यावर बोलताना भाऊ कदम म्हटले, प्रेक्षकांनी आम्हाला नेहमी स्टेजवरच पाहिले. ठराविक पंचेस आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मिळत असत लोकांना आम्हाला एका साचेबद्ध पद्धतीत पाहण्याची सवय झाली होती त्यामुळे त्यांना आमचे आऊटडोर शूटिंग आवडले नसावे. पण हा शो प्रेक्षकांचाच आहे आणि आम्ही त्यापद्धतीनेच आता लोकांसमोर येऊ असेही भाऊ यांनी सांगितले.  

 

विश्वदौरा फसला, सांगतोय कुशल बद्रिके..
कुशल म्हटला की, आमचा विश्वदौरा हा एक वेगळा प्रयत्न होता. आमचा महाराष्ट्र दौरा, भारतदौऱ्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. आम्हाला वाटले होते की आता आमचा विश्वदौरा लोक डोक्यावर घेतील पण आमचा प्रयत्न फसला. हा फसलेला प्रयत्न आम्हीसुद्धा स्वीकारला आहे. आता पुन्हा आम्ही लोकांना आवडेल असा कार्यक्रम देण्याचा आम्ही प्रयत्न करु. मराठी पऐ्रेक्षक आमचे मायबाप आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला डोक्यावर घेतले त्याप्रमाणे त्यांना आमची चुक कुठे झाली हे सांगण्याचा अधिकार आहे. आमच्याकडून दर्जेदार विनोदांची निर्मिती होत नाही हे आम्हालाही कळत आहे आता चुका सुधारुन पुन्हा सर्वांसमोर येऊ फक्त आम्हाला थोडा वेळ द्या असे कुशल म्हणाला.

 

आता लहान मुल तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल..
कुशलने बोलताना असे उदाहरण दिले की, आपल्या घरातील एखादे लहान मुल असते ना जे आपल्या मर्जीप्रमाणे वागत नाही पण आता त्या लहान मुलाला समज आली आहे आणि आता तुम्ही जस सांगाल तसच आम्ही वागणार आहोत. 

 

हिडिस कार्यक्रम कधीच केला नाही...
 आम्ही जेव्हाही स्त्रीपात्र रंगवतो तेव्हा मान्य आहे की बऱ्याचवेळा विनोदनिर्मिती होत नाही पण कुठलाही कार्यक्रम हिडीस होणार नाही याची आम्ही काळजी घेतो. संपूर्ण कुटुंबासोबत बसून जर आपल्याला कार्यक्रम बघता आला नाही तर तो कार्यक्रम करण्याचा आपल्याला अधिकार नाही असे आम्ही मानतो. काही एपिसोडचे चित्रीकरण झाले आहे त्यामुळे त्यात बदल करता येणे शक्य नाही पण आता काही काळ गेल्यानंतर पुन्हा 'चला हवा येऊ द्या'ची हा जोरात सुरु होईल असे कुशल म्हणाला.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, चला हवा येऊ द्या टीमचे विश्वदौऱ्यावेळचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...