आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगली चाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपड करते...तिचं नशीबही तिला साथ देत.. स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची सुवर्ण संधी तिला मिळते आणि तिचं छोट्या पडद्यावर भव्य पदार्पणही होतं...
ही प्रेरणादायी कथा आहे 'छोटी मालकीण' एतशा संझगीरीची! स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेत एतशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एतशानं सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर ती नोकरीही करत होती. मात्र, नोकरीत काही मन रमत नव्हतं. कथकचं शिक्षण घेत असल्यानं परफॉर्मन्सची भीती वाटत नव्हती. अशातच तिच्या समोर संधी चालून आली ती एका सौंदर्य स्पर्धेची. त्यात तिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तिला एक पुरस्कारही मिळाला आणि तिचं नशीब पालटलं. दशमी क्रिएशन्सनं तिला हेरलं आणि 'छोटी मालकीण' या नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली. पहिल्याच मालिकेत तिला डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिल राजेशिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे.
"माझ्यासाठी हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. कारण, मला अभिनयाची, नाटकाची, चित्रपटाची कसलीच पार्श्वभूमी नाही. घरी कुणीही या क्षेत्रात नाही. नोकरी करणारी मुलगी ते अभिनेत्री हा जेमतेम एका वर्षात घडलेला प्रवास आहे. या सगळ्यात माझ्या आई-वडिलांनी मला खूप खंबीर पाठिंबा दिला. आजपर्यंत स्टार प्रवाहच्या मालिका पहात होते. आता त्याच चॅनेलवर आपण दिसणार याचा आनंद खूपच प्रचंड आहे,' असं एतशानं सांगितलं.
"छोटी मालकीण म्हणजेच 'रेवती' या व्यक्तिरेखेच्या काही छटा माझ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. तसंच मालिकेची कथाही मला खूप आवडली. त्यामुळे ही मालिका करावीशी वाटली. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्टार प्रवाह. स्टार प्रवाहनं कायमच नव्या कलाकारांना संधी दिली आहे. पहिल्याच मालिकेत एवढ्या मोठ्या चॅनेलसह, डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, अशा दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळणं स्वप्नवत आहे. मला हा महत्वपूर्ण ब्रेक दिल्यामुळे मी स्टार प्रवाहची ऋणी आहे. आमची निर्मिती संस्था दशमी क्रिएशन्सनंही मला सांभाळून घेतलं. मला खात्री आहे, 'छोटी मालकीण' प्रेक्षकांना नक्की आवडेल." असं एतशानं उत्साहाने सांगितलं.
पुढच्या स्लाईढवर पाहा, एतशा सतगिरीचे काही खास Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.