आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. 21 एप्रिल 1950 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांनी पिजिक्स विषयात ग्रॅज्युएशन केल्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा केला. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या ‘सीआयडी’ या प्रसिद्ध मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले आहेत. गेल्या 20 वर्षांहून अधिक काळापासून शिवाजी साटम या मालिकेत ‘एसीपी प्रद्युम्न’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात त्यांच्याविषयी बरंच काही...
बँकेत करायचे नोकरी...
शिवाजी साटम यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केले आहे. विशेषतः त्यांना 'सीआयडी' या मालिकेसाठी ओळखले जाते. 1998 पासून ते या मालिकेशी जुळले आहेत. अभिनय करत असतानाच दुसरीकडे ते बँकेतही नोकरी करत असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. साटम यांनी 2000 पर्यंत नोकरी केली. खंर तर चित्रीकरण आणि नोकरी या गोष्टीत ताळमेळ घालणे त्याला प्रचंड कठीण जात असे. पण तरीही त्याने आपली नोकरी सोडली नाही. याविषयी एका मुलाखतीत शिवाजी साटम यांनी सांगितले होते, "मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्षं काम करत होतो. नोकरी सांभाळून मी अभिनयक्षेत्रात कार्यरत होतो. बँकेतील माझ्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी मला खूपच समजून घेतले. चित्रीकरणामुळे बँकेत जाणे शक्य नसल्यास मी एकदम सकाळी अथवा रात्री उशिरा बँकेत जाऊन माझी कामं पूर्ण करत असे. पण कधीच कोणीही या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे मी 2000 पर्यंत नोकरी करू शकलो. पण नंतर माझी पत्नी खूप आजारी पडली. तिच्या आजारपणामुळे आणि मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे शक्य होतच नव्हते. सतत होत असलेल्या दांड्यामुळे मला बँकेकडून पत्र आले. आता आपल्याला नोकरी करणे जमणार नाही याची मला जाणीव झाल्याने मी राजीनामा दिला."
पुढील स्लाईड्सवर वाचा, कशी मिळाली होती शिवाजी साटम यांना 'सीआयडी'मधील ‘एसीपी प्रद्युम्न’ही भूमिका...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.