आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: लोकप्रिय 'क्लॅप साँग गर्ल' अंतरा नंदी आहे 'संगीत सम्राट पर्व 2'ची स्पर्धक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले.संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वातस्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या  टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक असणार आहेत.

 

पर्व २ रे मध्ये स्पर्धक देखील एका पेक्षा एक आहेत. परीक्षक आणि कॅप्टन्सनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अतिउत्तम आणि तितक्याच ताकदीचे स्पर्धक निवडले आहेत. या स्पर्धेत एक काहीसा ओळखीचा चेहरा देखील आहे आणि ती स्पर्धक आहे अंतरा नंदी. अंतरा नंदी मधल्या काळात तिच्या क्लॅप सॉंगच्या व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. या व्हिडिओमध्ये ती आणि तिची बहीण कुठल्याही वाद्याचा वापर न करता फक्त टाळ्यांच्या तालावर गाणं म्हणतात. अंतराच्या या व्हिडिओजना नेटिझन्सनी देखील उचलून धरलं आणि अंतराचं खूप कौतुक देखील केलं.

 

अंतरा ही एक प्रशिक्षित गायिका आहे, तसेच ती १० वर्षांची असताना एका सिंगिंग रिऍलिटी शो ची फायनलिस्ट देखील होती.तिच्यातील टॅलेंटची खुद्द सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी प्रशंसा केली आहे. संगीत सम्राट पर्व २रे मधील तिचे परफॉर्मन्सेस देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. संगीत सम्राटचा मंच हा फक्त गयानापुरता मर्यादित नसून तोसंगीतप्रेमींसाठी खुला आहे. अंतराच्या मते संगीत हे प्रत्येक गोष्टीत आहे. संगीतासाठी कुठल्याही वाद्याची गरज नाही लागत आणि म्हणून ती संगीत सम्राट पर्व २रे मध्ये सहभागी झाली आहे जिथे संगीतासाठी खुला मंच सर्व गायकआणि संगीतकारांना उपलब्ध करून दिला आहे. संगीत सम्राट हा एकमेव रिऍलिटी शो आहे जो गाण्यांच्या पलीकडे जाऊन संगीताची प्रचिती प्रेक्षकांना देतो आणि म्हणूनच प्रेक्षक देखील या अनोख्या कार्यक्रमावर प्रेमाचा वर्षाव करतात.

बातम्या आणखी आहेत...