आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी चित्रपटसृष्टीतील असे एक अभिनेते ज्यांचे नाव सुवर्णअक्षरांत कोरले गेले आहे ते म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके यांचा 14 मार्च रोजी 21 वा स्मृतीदिन होता त्यानिमित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. दादा कोंडके यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटातही काम केले आहे. त्यात 'तेरे मेरे बीच मै', 'अंधेरी रात मै दिया तेरे हात मै' 'खोल दे मेरी जुबान' यांसारख्या चित्रपटात काम केले होते. त्यातील 'खोल दे मेरी जुबान' या चित्रपटात दादा कोंडके यांनी कॉमेडियन मेहमूद यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या काही खास आठवणी 'यादगार पल' या पुस्तकातून खास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. दादा कोंडके यांच्या स्टुडिओत जमायची मैफील...
दादांच्या भोर तालुक्यातील इंगवली येथील दादा कोंडके स्टुडिओत दादा नेहमी पत्रकारांना बोलवत असत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारण्याची त्यांना फार हौस होती. दादांनी 'खोल दे मेरी जुबान' या चित्रपटाच्या सेटवर पत्रकारांना बोलवले. यावेळी मेहमुद त्यांच्या करिअरच्या उतारावर होते आणि त्यावेळी दादांनी त्यांच्यासोबत काम करण्याबद्दल लोकांना प्रश्न पडला होता. हिंदीतील दिखाऊगिरीच्या पार्ट्यांची सवय असलेले मेहमुद दादांच्या मनमोकळेपणाने आणि घरगुतीपणा, घरगुती जेवण या गोष्टी पाहून ते भारावले आणि ते पार्टीत जास्तच खुलले आणि त्यांच्या काही खास आठवणी शेअर केल्या.
मेहमूद यांनी यावेळी महेशच्या भूमिकेतील त्यांचे दीर्घकालीन 'यश', 'प्यार किये जा', 'हमराही', 'मै सुंदर हु', 'मस्ताना' 'साधु और शैतान', 'पडोसन', 'वरदान', 'लाखो मै एक' यांसारख्या चित्रपटांच्या सेटवरील किस्से सांगण्यास सुरुवात केली. 'कुंवारा बाप'पासूनचे दिग्दर्शन आणि 'जनता हवालदार'च्या दिग्दर्शनावेळी राजेश खन्ना यांनी त्यांना दिलेला त्रास, त्यांचा बंगळुरुचा फार्महाऊस यांसारख्या एक ना अनेक आठवणी जागविल्या आणि त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या.
कोणत्याही विषयावर अखंड बोलत दादा कोंडके..
दादा कोंडके एक असे व्यक्तीमत्तव होते जे अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आणि विषयावरच्या गप्पा मारण्यासाठी नेहमीच उत्सुक असत. शिवसेनापासून फिशकरीपर्यंत त्यांच्या आवडीच्या गप्पा ते मारत आणि अखंड बडबड करत. अनेक चावटपणाचे किस्सेही ते इतके रंगून सांगत की आजही ते किस्से आठवून त्यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना आजही हसू आले नाही तर नवल.
चित्रपट झाला फ्लॉप..
दादा कोंडके आणि मेहमूद यांचा चित्रपट खोल दे मेरी जुबान हा फ्लॉप ठरला. तसे पाहिले तर दादा कोंडके यांचे हिंदी चित्रपट फारसे चालत नसत पण दादा कोंडके आणि मेहमूद हे दोघे आज ह्यात नसताना त्यांची भेट होणे आणि त्यांच्यासोबत मनमुराद गप्पा मारणाऱ्या पत्रकारांच्या नक्कीच लक्षात राहिली असेल.
पुढच्या स्लाईडवर पाहा, दादा कोंडके आणि मेहमूद यांच्या 'खोल दे मेरी जुबान' चित्रपटाचे फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.