आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा कोंडके यांचा 'या' मराठी अभिनेत्रीवर जडला होता जीव, लग्नास नकार दिल्यावर असा घेतला होता सूड !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांची आज 20वी पुण्यतिथी. ज्यांच्या चित्रपटाची रिलीज डेट आल्यावर मराठीच नव्हे तर बॉलिवूडमधील भल्याभल्यांना घाम फुटत असे दादा कोंडके केवळ अभिनेतेच नाही तर चित्रपट निर्मातेही होते. सत्तरीचा आणि ऐशींच्या दशकात त्यांचे मराठी सिनेमे तुफान गाजले आणि ते त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटात हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे, उषा चव्हाण.

 

दादा कोंडके यांच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा आज चित्रपटांपासून दूर आहेत. दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा यांच्याशी लग्नही करायचे होते. पण उषा यांनी यांस नकार दिल्यानंतर सूड घेण्यासाठी बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी अनेक वाईट गोष्टी लिहील्या. उषा यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा ६ ते ७ वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर केला आहे.
 
अशी होती उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची पहिली भेट..
दादा कोंडके यांना त्यांच्या 'सोंगाड्या' या चित्रपटासाठी अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानकाजवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता, असे उषा म्हणतात.


पुढच्या स्लाईडवर वाचा कोण आहेत उषा चव्हाण आणि कोणते धक्कादायक खुलासे केले..

बातम्या आणखी आहेत...