आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशा पारेख यांना दादा कोंडके यांनी केली होती चित्रपटासाठी विचारणा, 'या' एका गोष्टीने मिळाला नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील एक असा विनोदी चित्रपट ज्याला कोणत्याच चित्रपटाची तोड नाही तो म्हणजे सोंगाड्या. दादा कोंडके यांच्या आज 20व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा पहिलाच चित्रपट सोंगाड्याविषयी खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. याच चित्रपटातून दादा कोंडके यांनी त्यांच्या रुपेरी पडद्यावरचा प्रवास सुरु केला होता आणि हा चित्रपट तुफान लोकप्रियही ठरला होता. उषा चव्हाण आणि दादा कोंडके या जोडीने तेव्हा सर्वत्र धुमाकुळ घातला होता पण फार कमी जणांना माहीत आहे की उषा चव्हाण 'सोंगाड्या' चित्रपटासाठी दादा कोंडके यांची पहिली पसंत नव्हत्या. त्याअगोदर आशा पारेख आणि जयश्री गडकर यांना या चित्रपटात अभिनेत्री म्हणून घ्यायची दादा यांना इच्छा होती. 


आशा पारेख यांना मराठी चित्रपटात करायचे होते काम..
त्याकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांची ओळख होती पण एक वेगळा प्रोजेक्ट म्हणून मराठी चित्रपटात काम करण्याची आशा पारेख यांची इच्छा होती. हे कुठुनतरी दादा कोंडके यांना कळाले तेव्हा ते सोंगाड्याची स्क्रिप्ट घेऊन आशा पारेख यांना भेटायला गेले. आशा यांना स्क्रिप्ट फार आवडली आणि त्यांनी या चित्रपटात त्यांचा नायक कोण अशी विचारणा केली. तेव्हा दादा यांनी मी स्वतः या चित्रपटात नायक आहे असे सांगितले. तेव्हा आशा पारेख यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले आणि त्यांच्या कपाळावरील आठ्या पाहून दादा कोंडके यांनी तिथून काढता पाय घेतला. या दोन प्रसंगाचा असा परिणाम झाला की दादा कोंडके यांनी कधीच कोणत्याच अभिनेत्रीला चित्रपटात माझी नायिका बनशील का असे विचारले नाही.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, जयश्री गडकर यांनाही केली होती 'सोंगाड्या'साठी विचारणा...

बातम्या आणखी आहेत...