आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज रंगणार झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्सचा महाअंतिम सोहळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करुन झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन केले. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत गेली आणि परीक्षकांनी तावून तुलाखून महाराष्ट्राला 5 उत्तम डान्सर्स दिले. ओम डान्स ग्रुप, चेतन साळूंखे, वाय 3 डान्हॉलीक्स, सद्दाम शेख आणि गँग 13 हे 5 स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी भिडणार आहेत.
10 जून रोजी होणा-या डान्स महाराष्ट्र डान्सच्या ग्रँड फिनाले मध्ये हे 5 स्पर्धक मंच गाजवणार आहेत. सुरुवातीपासून प्रेक्षकांची दाद मिळवणारा सद्दाम महाअंतिम सोहळ्यात कुर्बान हुआ आणि टिकटिक वाजते या लोकप्रिय गाण्यावर फ्रीस्टाईल डान्स सादर करणार आहे. प्रेक्षकांचा आवडता ओम डान्स ग्रुप चांद मातला आणि जीव रंगला या गाण्यांवर इंडियन कॉन्टेम्पररी नृत्य सादर करणार आहे. किंग ऑफ पॉपिंग चेतन साळुंखे तुझ्या प्रीतीचा अविभाज्य भाग असलेले कर्यक्रमाचे परीक्षक हे देखील मंचावर थिरणार आहेत. एनर्जीचा वोलकॅनो अभिनेता सिध्दार्थ जाधव हुप्पा हुय्या, फाफे आणि खलिबली या गाण्यावर ठेका धरणार आहे. तर ग्रेसफुल कोरिओग्राफर फुलवा खामकर देखील इंडियन कॉन्टेम्पररी तसेच लावणी प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. मनोरंजनाचे परिपुर्ण असलेला हा महाअंतिम सोळ्यात झी युवावरील प्रेक्षकांच्या लाडक्या आणि आवडत्या नायिका सुरुची अडारकर, ऋता दुर्गुळे, श्रुती अत्रे, अश्विनी कासार आणि कौमुदी वालोलकर या स्पर्धकांचा उत्साह वाढवणअयासाठी सहभागी झाल्यात. तसेच त्यांनी देखील काही लोकप्रिय गाण्यांवर ताल धरला. त्याचबरोबर डान्स महाराष्ट्र डान्सच्या फिनाले पर्यंत न पोहोचू शकलेले स्पर्धक देखील या मंचावर त्यांची कला सादर करुन प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...