आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death anni:या मराठी अभिनेत्रीचा अपघातात झाला होता मृत्यू, दुरदर्शनवर केले होते वृत्तनिवेदीकेचे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालकलाकार ते मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या भक्ती बर्वे यांची आज 17 वी पुण्यतिथी. 10 सप्टेंबर 1948 रोजी मुंबईत भक्ती यांचा जन्म झाला होता. भक्ती यांनी केवळ मराठीतच नव्हे तर गुजराती आणि हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. 12 फेब्रुवारी 2001 रोजी वाई येथून मुंबईला परततांना भक्ती बर्वे यांच्या गाडीला अपघात झाला आणि त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा खास जीवनप्रवास आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. लहानपणापासून होती अभिनयाची आवड...

 

भक्ती बर्वे यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल. आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. 'ती फुलराणी' हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. 'ती फुलराणी' चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. 'आई रिटायर होतेय' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 

हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी केला होता विवाह...
भक्ती बर्वे यांनी हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते शफी इनामदार यांच्याशी विवाह केला होता. 13 मार्च 1996 रोजी शफी यांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले. त्यावेळी ते 'तेरी भी चुप मेरी भी चुप' या कॉमेडी मालिकेत काम करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने ही मालिका बंद करण्यात आली होती. त्यानंतर 4 वर्षांनी भक्ती बर्वे यांचेही अपघाती निधन झाले. अशाप्रकारे शफी हे वयाच्या 50व्या तर भक्ती ह्या वयाच्या 52व्या वर्षी मृत्यूमुखी पडल्या. 

 

भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके...
अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय, (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे) आधे अधुरे, (हिंदी आणि मराठी) आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी, (बालनाट्य) गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम, (बालनाट्य) जादूची वेल, (बालनाट्य) टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे, तो पुरुष पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपॉलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी, (मराठी, हिंदी आणि गुजराती) वयं मोठं खोटम्, (बालनाट्य) शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप. 

 

संदर्भ - अशोक उजळंबकर 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, भक्ती बर्वे यांचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...