आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणादाच्या 'वहिनी'साहेबांचा 'चिठ्ठी'चा घोळ कळला का तुम्हाला?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिचे आता एक वेगळे रुप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 'तुझ्यात जीव रंगला'सह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. "चिठ्ठी" या आगामी चित्रपटात धनश्री मेन लीडमध्ये झळकणार असून नवीन वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अलीकडेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे. 

 

डांगे एंटरटेन्मेंटच्या विशाल डांगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती ही त्यांनीच केली आहे. वैभव काळुराम डांगे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून स्वरदा बुरसे आणि सुजय जाधव यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. धनश्री काडगावकर आणि शुभंकर एकबोटे ही नवी जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. एक तरूण आपल्या प्रेयसीला चिठ्ठी लिहितो मात्र, ती चिठ्ठी तिला मिळतच नाही आणि काय धमाल होते, असं या चित्रपटाचं कथानक आहे.  

 

'चिठ्ठी'साठी कशी झाली धनश्रीची निवड, वाचा पुढील स्लाईडवर...

बातम्या आणखी आहेत...