आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Tellyworld:असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात? 'अंजली' मालिकेत उलगडणार कोडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युथफूल कन्टेन्टने प्रेक्षकांना मनाने चिरतरुण ठेवणाऱ्या झी युवा या वाहिनीने प्रत्येक मालिकेतून वेगवेगळे विषय देऊन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजित केले आहे. एक यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्नपाहणारी डॉ. अंजली प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. तिचा महत्वाकांक्षीपणा आणि प्रत्येक परिस्थितीला निडरपणे सामना करण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आणि अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले. सध्यामालिकेमध्ये एक अनोखा ट्विस्ट प्रेक्षक पाहत आहेत.


डॉ. असीम आणि डॉ. अंजलीचा साखरपुडा झाला आणि डॉ. यशने त्या दोघांना एक मोबाईल हॉस्पिटल भेट केले. त्यानंतर डॉ. असम बेपत्ता होतो आणि त्याचा आरोप मात्र डॉ. यशवर येतो.  डॉ. यशचे अंजलीवर असलेले एकतर्फीप्रेम लक्षात घेता पोलिसांनादेखील डॉ. यशवर संशय येतो आणि त्यामुळे असिमच्या बेपत्ता होण्यामागे त्याचा हात असावा अशी शंका घेतली जात आहे. यश अंजलीला समजावण्याचा प्रयत्न करतो की यात त्याचा काही हात नाही पणकोणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. यशच्या प्रेमात पडलेली रोहिणी मात्र एकच व्यक्ती आहे जी त्याच्या बाजूने उभी राहते. यश त्याचं प्रेम मिळवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतनाही असावविश्वास देखील रोहिणीडॉ. यशवर दाखवते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंजली मालिकेतील कलाकारांचे काही फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...