आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive : असा आहे Bigg Boss मराठीचा पहिला कॅप्टन विनीत भोंडेचा आशियाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबादः  कलर्स वाहिनीवर 'बिग बॉस मराठी' हा रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या शोमध्ये मराठी इंडस्ट्रीतील 15 नावाजलेले सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. या 15 जणांमध्ये एक कलाकार हा मराठवाड्यातील आहे. आम्ही बोलतोय ते मुळचा औंरगाबाद असलेल्या विनीत भोंडे या अभिनेत्याविषयी. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी छोटा पॅकेट बडा धमाका अशी काहीही छाप विनीतची पडली. पहिल्याच दिवशी त्याला घरातील जवळपास सर्व सदस्यांनी नॉमिनेट केले होते. नंतर मात्र डाव पलटला आणि विनीत चक्क बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा पहिला कॅप्टन झाला. कॅप्टनपदी विराजमान झाल्यानंतर विनीत आता आठवड्याभरासाठी घरात सेफ झाला आहे.  विनीत कॅप्टन झाल्याने साहजिकच त्याचे कुटुंबीय अतिशय आनंदात आहेत.  विनीत या शोमध्ये लांबचा पल्ला गाठेल असा विश्वास त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. 

 

औंरगाबाद येथे आहे विनीतचे स्वतःचे घर... 

विनीतचे कुटुंबीय मुळचे नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील आहे. पण गेल्या 45 वर्षांपासून त्याचे आईवडील औरंगाबाद येथे स्थायिक झाले आहेत. सुरुवातीला हे कुटुंब औरंगाबादच्या खडकेश्वर या भागात वास्तव्याला होते. पण 2008 डिसेंबरमध्ये विनीतच्या आईवडिलांनी वाळूज महानगर येथे मोठी वास्तू उभी केली. 'इंदिरानाथ' असे त्याच्या घराचे नाव आहे. 

 

दहा रुमचे आहे मोठे घर...

2006 साली विनीतच्या वडिलांनी वाळूज येथे 2000 चौ. फुट जागा खरेदी केली आणि त्यावर बांधकाम करुन दहा रुमचे मोठे घर उभे केले. त्यातील पाच खोल्यांमध्ये विनीतचे कुटुंबीय वास्तव्याला आहेत.  

 

नवीन घरात आल्यानंतर विनीतला मिळाला होता त्याचा पहिला चित्रपट...

विनीतला नवीन घरात राहायला आल्यानंतरच मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. लक्ष्य या एकांकिकेतील त्याचा अभिनय बघून दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी त्याला 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटात संधी दिली होती. येथूनच त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली. 

 

भावंडांमध्ये सर्वात लहान आहे विनीत..

विनीतच्या घरी त्याचे आईवडील, दोन भाऊ, वहिनी आणि पुतणे आहेत. अलीकडेच विनीतचे लग्नदेखील झाले आहे. सोलापूरच्या सोनम पवार या तरुणीची विनीतने जोडीदाराच्या रुपात निवड केली. 4 मार्च रोजी तो लग्नाच्या बेडीत अडकला. विनीतला दोन थोरले भाऊ आहेत. विशाल आणि विपूल ही त्यांची नावे आहेत. थोरला भाऊ विशाल हा कंपनीत अकाउंटंट पदावर कार्यरत आहे, तर धाकटा भाऊ विपूल हा सीए आहे. विनीतच्या दोन्ही वहिनीही वर्किंग वुमन आहेत. तर पत्नी सोनम ही नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. 

 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन ठरलेल्या विनीतच्या औंरगाबाद येथील घराची खास झलक दाखवत आहोत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या भोंडे कुटुंबात विनीत वाढला आहे. चला तर मग पाहुयात, विनीतच्या आशियानाची खास झलक... 

 

(फोटो - नितीन सुलताने/निलेश जोशी)

बातम्या आणखी आहेत...