आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

#WorldDanceDay:मराठी इंडस्ट्रीतील डान्सिंग क्वीन आहेत या काही अभिनेत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज वर्ल्ड डान्स डे. डान्सची आवड नाही असा माणूस तर विरळाच. सध्या टीव्हीवर असणाऱ्या अनेक रिअॅलिटी शोजमुळे तर नृत्याबद्दल प्रेक्षकांचे असलेले प्रेम वाढण्यात फारच मदत झाली आहे. पण नृत्याबद्दलचे खरे आकर्षण असते ते आपल्या आवडत्या कलाकारांमुळे. अगदी लहानपणापासून आपण आपल्या आवडत्या कलाकारांचे नृत्य आपण पाहत असतो आणि त्याचमुळे खरतर आपल्या मनात नृत्याची आवड निर्माण होते. मराठमोळी माधुरी दीक्षीत कितीतरी नृत्यप्रेमींचे प्रेरणास्थान असेल त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही पण केवळ माधुरीच नव्हे तर मराठीतील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या डान्सिंग क्वीन म्हणून ओळखले जातात. 

 

अमृता खानविलकर
'वाजले की बारा' म्हणत सर्व महाराष्ट्राला तिच्या नृत्याने वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकरचे नाव मराठीतील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत आहे. मग ते सौंदर्य असो, अभिनय असो अथवा नृत्य अमृता खानविलकर सर्च बाबतीत अग्रेसर आहे. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटातही अमृताने तिचा चांगला जम बसविला आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मराठीतील नृत्यात पारंगत असलेल्या खास अभिनेत्री...

बातम्या आणखी आहेत...