आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Famous Marathi Actor Dr. Kashinath Ghanekar Personal Life Facts: असे होते अभिनय सम्राट डॉ. काशीनाथ घाणेकरांचे आयुष्य, सुलोचना दीदींचे होते जावई

Facts: असे होते अभिनय सम्राट डॉ. काशीनाथ घाणेकरांचे आयुष्य, सुलोचना दीदींचे होते जावई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे, यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. 

 

रायगडाला जेंव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यु, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. या महान अभिनेत्याला वायकॉम 18 मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर “आणि .... काशिनाथ घाणेकर” या  सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. 

 

 ‘आणि...काशिनाथ घाणेकर’या सिनेमात. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे तसेच त्यांच्यासोबत असणार आहे सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन. हा सिनेमा 7 नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीज होत आहे. 1960 च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या कसा होता डॉ. काशीनाथ घाणेकरांचे जीवनप्रवास... 

बातम्या आणखी आहेत...