आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss मराठीच्या घरात होणार नवीन सदस्याची एन्ट्री, वाचा काय असेल Strategy

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रेक्षकांना तसेच घरामधील सदस्यांना एकानंतर एक सरप्राईझ मिळत आहे. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकर यांनी काल बिग बॉस मराठीचे घर सोडले, त्या घरामध्ये फक्त सात दिवसांच्या पाहुण्या होत्या असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले. हे ऐकताच सगळ्यांना धक्का बसला.       हर्षदा ताई बरोबर बाकीचे सदस्य देखील खूप भाऊक झाले. तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण ? याचे कोडे उलघडले. बिग बॉस यांनी शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेंव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार ? कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार ? या गोष्टीची उत्सुकता असतानाच आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत त्यागराज खाडिलकर. शर्मिष्ठा राऊतनंतर आता त्यागराज खाडिलकर बिग बॉसच्या मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर काय घडेल ? हे बघणे रंजक असणार आहे. 

 

त्यागराज खाडिलकर यांचा परिचय...
त्यागराज खाडिलकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात जागतिक मराठी परिषदेनिमित्त “स्मरणयात्रा” नावाच्या संगीताचा इतिहास सांगणा-या कार्यक्रमातून झाली. त्यागराज यांना अखिल भारतीय मराठी विद्यार्थी परिषदेचा “गानहिरा” हा पुरस्कार मिळाला असून ते संस्कृती कलादर्पण, महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराचे देखील मानकरी आहेत. त्यागराज यांनी ५२ हून अधिक मालिकांचे शीर्षक गीत गायले असून, अनेक सिनेमांचे संगीत दिग्दर्शन, पार्श्वगायन केलेले आहे.    ’हम पांच’, ’चुटकी बजाके’, ’टिकल ते पॉलिटिकल’ या मालिकेचे शीर्षक गीते खुपच गाजली. त्यागराज खाडीलकरांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला. त्यांनी आपले शाळेय शिक्षण कोल्हापुरमध्येच पूर्ण केले व पुढील शिक्षण पुणे येथे झाले. त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा होते. 

 

बिग बॉसच्या घरात जाण्यास उत्सुक.. 
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याअगोदर काही गोष्टी सांगितल्या. “बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मला जायची संधी मिळत आहे हे माझं भाग्याचं आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. कारण, या घरामध्ये जाण्याचे आमंत्रण किंवा संधी सगळ्यांच मिळत नाही. माझं इतक्या वर्षांच या क्षेत्रामधील योगदान असेल की, मला या घरामध्ये जाण्याची संधी मिळत आहे. मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे.

 

पुढे वाचा, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाताना काय असेल त्यागराज यांची Strategy... यासह बरंच काही... 

 

बातम्या आणखी आहेत...