आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेय वाघची भन्नाट फॅन आहे ही सांगलीची तरुणी, पाहा काय केले असे की भावनिक झाला 'फास्टर फेणे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेनमेंट डेस्क - 'मुरांबा', 'फास्टर फेणे' यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवणारा अभिनेता अमेय वाघचा सामना त्याच्या अशा एका फॅन्ससोबत झाला जिला भेटून तो फारच भावनिक झाला. अमेयच्या नावाचा चक्क टॅटूच या तरुणीने तिच्या हातावर गोंदविला आहे. अमेयने त्या तरुणीसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत आणि तिचे आभार मानले आहेत. 

 

अमेयच्या नावाचा टॅटू काढणाऱ्या या तरुणीचे नाव आहे ऐश्वर्या कडकोल. तिने तिच्या मनगटावर 'अमेय' असे नाव गोंदले आहे. यावर अमेयने एक भावनिक पोस्ट शेअर केली आणि त्यात माझी पात्रता नसतानाही मला मिळालेल्या प्रेमाचा मी ऋणी आहे अशा आशयाची पोस्ट लिहीली. ऐश्वर्या अमेयची मोठी चाहती आहे. या पोस्टवर अमेयने तिचे त्याच्यावरील प्रेमाची दखल घेतल्याचा आनंद तिने व्यक्त केला. 
 
 पुढच्या स्लाईडवर पाहा, अमेय वाघने शेअर केलेला ऐश्वर्याच्या टॅटूचा  खास Photo..

बातम्या आणखी आहेत...