आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 72 तास राबून या चाहत्याने अभिनेता प्रशांत दामले यांना दिली ही अनोखी भेट !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेल्या तुमच्यासाठी काय पन कार्यक्रमावरील गाजावाजा जंक्शनवर नुकतेच प्रशांत दामले येऊन गेले. सध्या ते संशय कल्लोळ आणि साखर खाल्लेला माणूस तसेच कलर्स मराठीवरील आज काय स्पेशल या कार्यक्रमामध्ये खूप बिझी आहेत. तरी देखील ते वेळात वेळ काढून त्यांनी गाजावाजा जंक्शनवर हजेरी लावली. ज्यामध्ये त्यांनी अनेक किस्से, आठवणी सांगितल्या. मराठी नाट्यसृष्टीतले विक्रमादित्य अशी त्यांची ओळख असून त्यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांचे हजारो, लाखो fans आहेत, जे त्यांना आपला गुरु, idol, प्रेरणास्थानी मानतात. असाच एक तुमच्यासाठी काय पन च्या मंचावर देखील आहे. ऋषिकेश विचारे हा कार्यक्रमामधील आर्ट डिरेक्शनच्या टीम मध्ये असून तो प्रशांत दामले यांचा खूप मोठा fan आहे. त्याने प्रशांत दामले यांच्यासाठी अनोखी भेट तयार केली ती म्हणजे त्यांचा स्केच. हा अप्रतिम स्केच त्याने स्वत: काढला आणि त्यांना दिला. ज्याबद्दलचा आनंद त्याने सोशल मिडीयावर देखील व्यक्त केला. हा स्केच बनविण्यासाठी त्याला तब्बल ७२ तास लागले.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, प्रशांत दामले यांचे स्केच घेतानाचे फोटो...