आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी \'फॅट टू फिट\' झाली मराठीतील \'बिकीनीगर्ल\' सई ताम्हणकर, पतीसोबत घटस्फोटाने दिला फॅन्सला Shock

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच तिचा आगामी सिनेमा 'राक्षस' घेऊन आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला फार चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सईचा एक डीग्लॅम अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. सईचे सध्याचे फोटो पाहता तिच्यात कमालीचा बदल दिसून येत आहे. सईने तिचे वजन खूप कमी केले आहे आणि त्यामुळे ती अजूनच ग्लॅमरस दिसत आहे. जीम, डाएटींगचा आधार घेत सईने स्वतःला फिट अॅण्ड फाईन ठेवले आहे. सईला फास्टफुड आणि गोड पदार्थ अजिबात आवडत नाही असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

 

विशेष म्हणजे सई ताम्हणकरने नवीन वर्षात तेजस नेरुरकरसोबतचे फोटोशूट फॅन्सबरोबर शेअर केला. यात सईचा एकदम बिनधास्त आणि बोल्ड अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर सईने एकामागोमाग एक इवेंट आणि फोटो शेअर करत तिचा स्टायलिश अंदाज प्रेक्षकांसमोर आणला आणि तिचे हे नवीन रुप पाहून चाहतेही आनंदले पण यादरम्यानच सई ताम्हणकरचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाल्याचे वृत्तही समोर आले. 

 

दीड वर्षापूर्वीच झालाय घटस्फोट...
सई ताम्हणकरने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिचा पतीसोबत घटस्फोट झाला असल्याचे सांगितले आणि तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. सई मुळची सांगलीची आहे आणि तिचा पती पुण्याचा आहे पण घटस्फोटानंतरही पुणे शहराशी तिचा जिव्हाळा असल्याचे तिने सांगितले. 

 

मिळाले दोन पुरस्कार..
मराठी इंडस्ट्रीतील एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून सईचे नाव घेतले जाते आणि यानिमित्त यावर्षीच तिला महाराष्ट्राज् मोस्ट स्टायलिश आणि फॅमिली कट्टा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे केवळ लुक्स नव्हे तर सईला 'ब्युटी विथ ब्रेन' असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सई ताम्हणकरचे नवीन वर्षातील काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...