आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिकी पडली माधुरीची जादू! कमाईत \'सैराट\'सह या फिल्म्सच्या मागे पडला \'Bucket List\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

25  मे रोजी रिलीज झालेल्या 'बकेट लिस्ट' या चित्रपटातून बॉलिवूडची मोहिनी अर्थातच अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. माधुरीच्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 96 लाखांची कमाई केली. तर शनिवारी आणि रविवारी कमाईत वाढ झालेली दिसली. या दोन दिवशी चित्रपटाने अनुक्रमे 1 कोटी 30 लाख आणि 1 कोटी 40 लाखांची कमाई केली.  तीन दिवसांत या चित्रपटाने एकुण 3 कोटी 66 लाखांचा गल्ला जमवला. एकुण 409 स्क्रिन्सवर बकेट लिस्ट हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. 

 

तसं पाहता, एवढी कमाई करुन बकेट लिस्ट यावर्षी चांगली ओपनिंग करणारा चित्रपट ठरला.पण माधुरीचे नवे रंग मराठीतील सैराट, लय भारी, टाइमपास या चित्रपटांपुढे फिके पडल्याचे दिसत आहे. कारण तीन दिवसांच्या कमाईविषयी बोलायचे झाल्यास सैराट, नटसम्राटसमोर माधुरीच्या चित्रपटाची कमाई कमी झाली आहे. 

 

एक नजर टाकुया, कोणकोणत्या मराठी चित्रपटांनी कमाई 'बकेट लिस्ट'ला टाकले मागे..

 

'सैराट'ची तीन दिवसांची कमाई  होती 12 कोटी  
29 एप्रिल 2016 रोजी रिलीज झालेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट या चित्रपटाने रिलीजच्या तीन दिवसांतच तब्बल 12 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने   रिलीजच्या पहिल्या दिवशी 3 कोटी 60 लाखांची कमाई केली होती. तर दुस-या दिवशी हा आकडा 3 कोटी 95 लाखांच्या  घरात होता. तर तिस-या दिवशी या चित्रपटाने तब्बल 4 कोटी 55 लाखांची कमाई केली होती. खरं तहर सैराटला पहिल्याच आठवड्यात पायरसीचा फटका बसूनही रिपीट ऑडिअन्स असल्यामुळे ही  कामगिरी करता आली होती. 'सैराट'ने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करुन मराठी चित्रपटांच्या इतिहासात विक्रम रचला. 


(नोट - चित्रपटांच्या कमाईचे सर्व आकडे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आहेत.)


पुढील स्लाईड्सवर वाचा, कोणकोणत्या मराठी चित्रपटांनी कमाईत माधुरीच्या 'बकेट लिस्ट'ला टाकले मागे... 

 

बातम्या आणखी आहेत...