आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'घाडगे & सून\' मालिकेत अक्षय-अमृता सापडले नवीन पेचात, माईंनी दिले हनिमून पॅकेज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'घाडगे & सून' मालिकेमध्ये सध्या अक्षय आणि अमृताचं घटस्फोट मिळविण्याचे नाटक सुरु आहे. घटस्फोट कसा मिळवता येईल आणि त्यासाठी सगळ्यांना कसे मनवता येईल याचे प्लनिंग हे दोघं मिळून करत आहेत. अक्षय आणि अमृता घाडगे परिवारातील सदस्यांना त्यांच्या नात्यामध्ये किती प्रोब्लेम सुरु आहे हे पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत आहेत, जेणेकरून ते लवकरात लवकर त्यांच्या घटस्फोट घेण्यासाठी घरच्यांची सहमती मिळवतील. पण, त्यांचे भांडण मिटविण्यासाठी आता माईनी अमृता आणि अक्षयला एक सरप्राईझ दिले आहे. हे सरप्राईझ म्हणजे हनिमुनचे package. 

 

माई दोघांनाही केरळला पाठवणार आहेत. आता हे ऐकून अमृता आणि अक्षयसमोर एक वेगळेच संकंट उभे राहिले आहे. माईना नाही देखील बोलू शकत नाही आणि हनिमूनला जायचे देखील नाही या द्विधा मनस्थितीमध्ये हे दोघेही अडकले असतानाच अर्जुन कियाराशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामध्ये अमृता - अक्षय हनिमूनला जायचे कसे टाळणार ? माईना आणि घरच्यांना घटस्फोट मिळविण्यासाठी अक्षय अमृताचे जे प्रयत्न सुरु आहेत ते कळणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

 
घाडगे सदन मध्ये अक्षय आणि अमृता हनिमूनला जाणार हे कळल्यापासून शॉपिंगची तयारी सुरु झाली आहे. घरामधील सगळेच त्यांना चिडवत आहेत कारण, लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच कुठे तरी बाहेर जाणार आहेत. आता अक्षय अमृता खरोखरच हनिमूनला जातील कि, या संकंटामधून कसे दोघं मार्ग काढतील हे बघणे गमतीशीर असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...