आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळी साडी, हलव्यांच्या दागिन्यांत सजली अमृता, लग्नानंतर अशी साजरी करणार पहिली मकरसंक्रांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' मालिकेला प्रेक्षकांनी मालिका सुरु झाल्यापासून भरभरून प्रेमं दिले. मालिकेमधील अक्षय आणि अमृताची जोडी, त्यांच्यातील मैत्री, भांडण, कडू–गोड आठवणी, लग्नापासून त्यांचा सुरु झालेला प्रवास ते आत्तापर्यंतच्या या दोघांच्या नात्याचे प्रेक्षक साक्षी आहेत.  

 

अमृताने नेहेमीच तिच्यासमोर येणाऱ्या आव्हानांना खंबीरपणे उत्तर दिले आहे. नुकतेच अमृताने माईना त्यांचे चोरीला गेलेले तोडे अक्षयच्या मदतीने मिळवून दिले आणि घरच्यांचा विश्वास जिंकला. पण ती माईचा विश्वास जिंकू शकेल का ? माई यावर काय बोलतील ? हे लवकरच प्रेक्षकांना मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळेल. घाडगे सदनमध्ये सगळेच सण मोठ्या जोशात साजरे केले जातात अशी घाडग्यांच्या घरची मुळी परंपराच आहे. मालिकेमध्ये लग्नानंतर अक्षय – अमृताची पहिलीच मकर संक्रांत असून माई ती आपल्या लाडक्या नातूसाठी मोठ्या जोश्यात साजरी करणार यात वाद नाही. अमृतासाठी काळी साडी, हलव्याचे दागिने असा पारंपरिक बेत असून याच्या सोबतीला तिळगूळाचे लाडू तर नक्कीच असणार आहेत. बघायला विसरू नका घाडगे & सून मकर संक्रांत विशेष भाग आणि तुमच्या लाडक्या अक्षय – अमृताची पहिली मकर संक्रांत रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

 
अक्षयच्या आईला म्हणजेच मृदुला घाडगे यांना कियारा आणि अक्षय अजूनही भेटतात आणि ते अजूनही एकमेकांना विसरले नसल्याच कळाले आहे. हे कळल्यानंतर मृदुला कियाराला भेटायला जाते आणि तिला अक्षयपासून दूर राहण्यास सांगते. कियारा मृदुलाचं हे सांगणे कितपत ऐकेल ? मकर संक्रांत आनंदात पार पडेल ? कियाराच्या मनामध्ये नक्की काय सुरु आहे ? हे सगळे वेळ आल्यावरच कळेल. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताचे काळी साडी आणि हलव्यांच्या दागिन्यांचे PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...