आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग्यश्री-चिन्मय सांगताय त्यांचे 2018चे संकल्प, 'अमृता' म्हणते, यावर्षी पूर्ण झाले अभिनेत्री बनण्याचे स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'घाडगे अॅण्ड सून' मालिकेत मुख्य भूमिका करणारी भाग्यश्री लिमये अर्थात प्रेक्षकांची लाडकी अमृता घाडगेने तिचे नवीन वर्षाचे प्लान्स आणि सरत्या वर्षाच्या अनेक आठवणी सोबत शेअर केल्या. ती म्हणते, "लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. कारण या वर्षात माझं अभिनेत्री होण्याच लहानपणापासूनचं स्वप्न प्रत्यक्षात आलं. पण, हा प्रवास सोपपा नव्हता कारण अपयश आलं की खचणं हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे माझ्या या स्वभावाला मुरड घालून यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रामाणिक प्रयत्न करणं हा माझं संकल्प होता. मी audition देतं राहिले अनेकदा सिलेक्शन झालं नाही तर कधी होता होता यशानं हुलकावणी दिली तरीही अपयशानं खचून न जाता अधिक उत्साहानं पुढची audition देत राहिले. आणि प्रयत्नांना यश अखेर मिळालं 'घाडगे & सून' या मालिकेतील अमृता या मुख्य भूमिकेसाठी माझं सिलेक्शन झालं आणि यावर्षीच माझं स्वप्नं मी पूर्ण केलं."

 

येत्या वर्षाच्या संकल्पाबद्दल विचारले असता भाग्श्रीने आगामी वर्षात आवाजावर आणि संगीत शिकण्यावर जास्त लक्ष देणार असल्याचे सांगितले. 

याच मालिकेतील भाग्यश्रीचा अभिनेता चिन्मय उदगीरकर अर्थात अक्षय घाडगेनेही त्याच्या नवीन वर्षाच्या आणि यंदाच्या वर्षाच्या आठवणी शेअर केल्या. यावर्षी 'घाडगे अॅण्ड सून' मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रेमाचे त्याने आभार मानले आणि यंदाच्या नवीन वर्षात आपण आज आहे त्यापेक्षा अधिक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन असा निश्चय केल्याचे सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, मालिकेतील चिन्मय-भाग्यश्रीचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...