आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'घाडगे & सून' मध्ये अक्षयने अमृताला उचलून चढल्या तब्बल ३०० पायऱ्या !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कलर्स मराठीवरच्या 'घाडगे & सून' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय...घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. 

 

घाडगेच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. याच वेळेस अक्षय आणि अमृताला जेजुरी मंदिराच्या ४०० पायऱ्या चढायच्या होत्या. परंतु अमृताच्या पायाला अचानक लागल्यामुळे अक्षयने अमृताला उचलून घेतले आणि खरोखरच सीन मध्ये चिन्मयने मंदिराच्या ३०० पायऱ्या चढल्या. अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे...खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे...

 

या जेजुरीच्या वारीबद्दल बोलताना चिन्मय म्हणाला, “जेजुरीला आमच्या संपूर्ण टीमवर देवाचीच कृपा झाली असं मी म्हणेन. शुटींग दरम्यानची मज्जा वैगरे नेहेमीच असते पण आम्हाला ती जागा अलौकिक वाटली. मी भाग्यश्रीला उचलून तब्बल ३०० पायऱ्या चढलो, माई म्हणजे सुकन्याताई देखील आमच्याबरोबर होत्या. आमचं पूर्ण युनिट पायऱ्या चढून वर गेलो. पण दुसऱ्या दिवशी सगळे त्याच जोमाने शुटींगला हजर होते. आता याला काय म्हणावे “देवाचीच कृपा”.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'घाडगे & सून' मालिकेच्या जेजुरीमधील शूटिंगचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...