आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियामध्ये 'या' कारणासाठी पोहोचले पाठकबाई-राणादा, विंटेज ड्रेसिंगमध्ये दिसले फारच निराळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तुझ्यात जीव रंगला' फेम राणादा आणि पाठकबाई सध्या ऑस्ट्रेलिया टूरवर आहेत. त्याचे कारण म्हणजे 'चला हवा येऊ द्या' विदेश दौरा. यावेळी राणादा-अंजलीबाई यांचा वेगळाच अंदाज प्रेक्षकासंमोर आला आहे. नेहमीच साडीमध्ये दिसणाऱ्या पाठकबाई आणि साध्या शर्ट-पँटमध्ये दिसणारा राणादा यावेळी फारच वेगळ्या अंदाजात दिसले. राणादाने यावेळी सुटबुट परिधान केला होता तर सर्वांच्या लाडक्या पाठकबाई गाऊनमध्ये दिसले.

 

'चला हवा येऊ द्या'च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले राणादा-पाठकबाई मंचावर मात्र पारंपारीक रुपात दिसले. पाठकबाईंनी यावेळी लाल रंगाची साडी घातली होती आणि तिचा हा लुक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. यावेळी चला हवा येऊ द्याच्या सर्वच कलाकारांनी आणि राणादा-पाठकबाई यांनी चांगलाच एन्जॉय केला असणार यात शंका नाही.

 

पुढच्या स्लाईढवर पाहा, राणादा-पाठकबाई यांचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...