आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : हर्षदा खानविलकरची शोमध्ये एन्ट्री, म्हणाल्या, 'मला जिंकायचं आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधील प्रत्येक सदस्य पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे मनं जिंकत असून, आता बिग बॉस मराठीचा प्रत्येक सदस्य प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. रोज या घरामध्ये सदस्यांबरोबर काय होते, कोणते टास्क दिले जातात, कोण कॅप्टन होणार तर कोण एलिमनेट होणार याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनामध्ये दर आठवड्याला असते. अल्पावधीतच बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनामध्ये विशिष्ट स्थान मिळवले आहे. मग मेघाची बिग बॉस जिंकण्याची जिद्द असो वा, सई – पुष्करची मैत्री असो.

 

आता या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अजून एका सदस्याची भरती झाली आहे. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणजेच हर्षदा ताई घरामध्ये गेली आहे. हर्षदा खानविलकर यांना महाराष्ट्राने प्रत्येक भूमिकेमध्ये स्वीकारले आणि प्रेम दिले आहे. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्यानंतर प्रेक्षक आणि रहिवाशी त्यांना स्वीकारणार ? त्या कसे सगळ्यांचे मनं जिंकणार ? कोणते धोरण आत्मसात करणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

 

शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी हर्षदा खानविलकर यांनी काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत, जाणून घेऊयात, शोविषयी काय म्हणाल्या त्या...

बातम्या आणखी आहेत...