आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Marathi cinema
  • Harshada Khanvilkars Wildcard Entry In Bigg Boss Marathi House आज \'अक्कासाहेबांची\' वाइल्डकार्ड एन्ट्रीसोबतच सेलिब्रेट होणार आस्तादचा बर्थडे

#BBMarathi : आज \'अक्कासाहेबां\'ची वाइल्ड कार्ड एन्ट्री, \'पुढचं पाऊल\'चं कुटुंब झालं पूर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस'च्या घरात काल प्रेक्षकांना स्पर्धकांच्या मनात असलेली खदखद बघायला मिळाली.  बिग बॉसने सर्व स्पर्धकांना एकमेकांविषयीचा राग व्यक्त करण्यासाठी चक्क 'व्यक्त व्हा मुक्त व्हा' असा टास्क दिला होता.  बिग बॉसच्या घरातील गार्डन एरियामध्ये एक पंचिंग बॅग आणि त्यासोबत बॉक्सिंग ग्लोव्हस ठेवण्यात आले होते. तसेच सर्व सदस्यांचे फोटोज शेजारी मांडले होते. घरातील आपल्या नावडत्या व्यक्तींचे फोटो त्या पचिंग बॅगवर लावून आपल्या मनातील राग बाहेर काढायचा होता. सदस्यांनीदेखील या टास्कमध्ये इतर सदस्यांविषयी वाटणाऱ्या कटू भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या मनात साठलेला राग व्यक्त केला. 


घरात साजरा होणार आस्ताद काळेचा वाढदिवस... 
या टास्कनंतर आज घरात आस्ताद काळेच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. 17 मे रोजी आस्तादने वयाची 35 वर्षे  पूर्ण केली. यानिमित्ताने बिग बॉसने आस्तादच्या बालपणीचा फोटो लावलेला केक घरात पाठवला असून सर्वच सदस्य मोठ्या दणक्यात आस्तादचा वाढदिवस साजरा करताना दिसतील. 


आज मिळणार स्पर्धकांना एक सरप्राइज....
कालच्या भागात मनातील खदखद व्यक्त केल्यानंतर आजच्या भागात स्पर्धक आनंदोत्सव साजरा करताना दिसणार आहेत. कारण आज घरात एक वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असून घरात येणारी ही नवी पाहुणी अनेक सेलिब्रिटी स्पर्धकांची जवळची मैत्रीण आहे. आजच्या भागात मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री जिला सर्वजण 'पुढचं पाऊल'मधील 'अक्कासाहेब' म्हणून ओळखतात, ती घरात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याविषयी. हर्षदा यांनी आस्ताद काळे, जुई गडकरीसोबत 'पुढचं पाऊल' या मालिकेत एकत्र काम केले होते. याशिवाय त्या रेशम टिपनिस, सुशांत शेलार यांच्या जीवाभावाच्या मैत्रीण आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनामुळे घरातील अनेक सदस्य भलतेच खुशीत दिसले. पण आता हर्षदा यांच्या येण्याने घरात येणा-या दिवसांत कोणकोणत्या घडामोडी घडणार, त्या मेघा, सई, उषा नाडकर्णी, ऋतुजा धर्माधिकारी यांच्यासह घरातील इतर सदस्यांसोबत कसं जुळवून घेणार, हे बघणं इंट्रेस्टिंग ठरणार आहे.  


पुढील स्लाईड्सवर बघा, आस्ताद काळेच्या बर्थडे सेलिब्रेशनचे खास Photos... 

 

बातम्या आणखी आहेत...