आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या Gorgeous तरुणीसोबत रोमान्स करणार अभिनय बेर्डे, शूटिंगला झाली सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मागीलवर्षी 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवशी नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. 'अशी ही आशिकी' हे त्यांच्या नवीन चित्रपटाचे नाव असून यामध्ये सचिन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेला साइन केले आहे. यूथ लव्हस्टोरी   असलेल्या या चित्रपटाच्या घोषणेवेळी सचिन यांनी अभिनेत्रीच्या नावाचा उलगडा केला नव्हता. पण आता त्यांना चित्रपटासाठी अभिनेत्री गवसली असून हेमल इंगळे हे तिचे नाव आहे.

 

अभिनय आणि हेमल या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. हेमलचा हा पहिलाच चित्रपट असून अभिनयचा हा दुसरा चित्रपट असेल. अभिनयने सतिश राजवाडेंच्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. आता 'अशी ही आशिकी'मधून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 

 

'अशी ही आशिकी'च्या शूटिंगला झाली सुरुवात...

'अशी ही आशिकी' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अभिनेते जयवंत वाडकर यांचीही एक महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटोज समोर आले आहेत. एका फोटोत सचिन पिळगावकर आणि जयवंत वाडकर एकत्र दिसत आहेत. तर आणखी एका फोटोत चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र दिसत आहेत.  

 

पुढील स्लाईड्सवर बघा, 'अशी ही आशिकी'च्या टीमचे फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...