आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Women\'s day Spl:डब्बेवाल्यांसोबत साजरा झाला होम मिनिस्टरचा महिला दिनाचा स्पेशल भाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर होम मिनिस्टर टीमला घेऊन थेट पोहोचले ते कर्जतच्या मोंटेरिओ रिसॉर्ट मध्ये. कारण होते महिला दिन विशेष भागाचे, या विशेष भागात सहभागी झाले होते डब्बेवाले आणि त्यांच्या होम मिनिस्टर. जे डब्बेवाले आपली भूक भागवतात त्यांना मनाचा मुजरा म्हणून त्यांच्या होम मिनिस्टर बरोबर ह्या खास भागाचा आयोजन करण्यात आलं होतं, आणि आदेश भावोजींनी सुद्धा त्यांना ट्रीट देत त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतला. याच खास भागात एक वाहिनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, गेल्या २५ वर्षामध्ये आम्ही कधी फिरायला हि बाहेर पडू शकलो नाही पण आदेश भावोजी आणि झी मराठीने आम्हाला हि संधी दिली त्याबद्दल खूप धन्यवाद.

 

हा महिला दिन विशेष भाग तुम्हाला पाहता येणार आहे गुरुवार ८ मार्च रोजी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, होम मिनिस्टर महिला दिन सेलिब्रेशनचे काही खास Photos

बातम्या आणखी आहेत...