आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Telly World: 'लागीर...'मध्ये अज्या-शीतलीचा मधुचंद्र, महाबळेश्वरमध्ये करत आहेत रोमान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'लागीर झालं जी' या  मालिकेत अलीकडेच शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.  लग्न झाल्यापासून अज्या आणि शीतली यांना एकत्र असा वेळच घालवायला नाही मिळत आहे. नातेवाईक आणि घरच्या सदस्यांची उठबस करण्यातच शीतलीचा सर्व वेळ जातो त्यामुळे अज्याची मात्र चिडचिड होतेय.

 

समाधान मामा आणि जीजी त्या दोघांनी एकत्र वेळ घालवावा म्हणून त्यांना बाहेर फिरायला जायचा सल्ला देतात. सध्या मालिकेत अज्या आणि शीतली त्यांच्या हनिमूनसाठी महाबळेश्वरला गेल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. महाबळेश्वरच्या गारव्यात अज्या आणि शीतली प्रेमाचे चार क्षण घालवत आहेत.

 

या खास भागाचे चित्रीकरण करताना शीतल म्हणजे अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, "प्रेक्षकांना अज्या-शीतलीचं प्रेम आणि त्यांची अनोख्या लव्हस्टोरी मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत व सर्व अडचणींपासून दूर, काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहेत त्यामुळे आमच्या इतकेच प्रेक्षक देखील खूप उत्सुक असणार आहेत."


अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण म्हणाला, "प्रेक्षक अजिंक्य आणि शीतलच्या लग्नासाठी खूपचं उत्सुक होते आणि आता ते एकत्र आले आहेत त्यामुळे त्यांना एकत्र बघताना देखील प्रेक्षकांना नक्कीच छान वाटत असणार आहेत. हनीमूनसाठी ते दोघे महाबळेश्वर सारख्या निसर्गरम्य ठिकाणी आले आहेत आणि प्रेक्षक लवकर हे पाहू शकणार आहेत की त्या दोघांनी महाबळेश्वर मध्ये काय मजा केली आणि ते कुठे कुठे फिरले."


पुढील स्लाईड्सवर बघा, अज्या-शीतलीचे महाबळेश्वरमधील खास क्षण... 

बातम्या आणखी आहेत...