आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#YogaDay: 'हम तो तेरे आशिक है' फेम माधवी स्वतःला अशी ठेवते फिट, हा आहे फिटनेस फंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघाची संसार, जावई विकत घेणे, स्वप्नांच्या पलीकडले, हम तो तेरे आशिक है या मालिका आणि संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करुन भागलं, धावाधाव, बायकोच्या नकळत या फिल्म्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर-कुलकर्णी. वयाची 34 वर्षे ओलांडलेली माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते. माधवी तीन वर्षांच्या मुलाची आई आहे. रुबेन हे तिच्या मुलाचे नाव आहे. टीव्ही आणि फिल्म्ससोबतच माधवी रंगभूमीवरही रमते. सध्या तिचे सुरक्षित अंतर ठेवा हे नाटक रंगभूमीवर सुरु आहे. घर आणि करिअर करताना माधवीचीसुद्धा तारेवरची कसरत सुरु असते. पण एवढ्या बिझी शेड्युलमध्येही ती स्वतःच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते आणि नियमित व्यायाम करते. यासाठी माधवी योगाची मदत घेते. पारंपरिक योगाला तिची पसंती आहे. 

 

याविषयी एका मुलाखतीत माधवीने सांगितले, “फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही. त्यामुळं मी पारंपरिक योगा करते. गेल्या अनेक वर्षांपासून मी योगा करत आले आहे. योगामुळे मला खूप फायदा झाला. पण कधी कधी महिन्याभराचा व्यायामाला ब्रेक झाल्यास, माझे वजन झपाट्याने वाढते. अशावेळी योगाच्या मदतीने मी वजन पुन्हा नियंत्रणात आणले. योगासोबतच दररोज 45 मिनिटांचा मी वॉक घेते. नियमित योगा आणि चालण्यामुळे फिजिकल आणि मेंटल बॅलेन्स ठेवणे शक्य होते. व्यायामुळे मला दिवसभर प्रसन्न वाटतं. डाएट म्हणजे कमी खाणं असं अनेकांचा गैरसमज आहे. मात्र तसं काही नसतं. मी आरोग्यला पोषक असं डाएट घेते म्हणजेच तेलकट पदार्थ खाणं टाळणं. मी भात खात नाही. जेवणात आवश्यकतेपेक्षा जास्त तूप घेत नाही आणि गोडही कमी खाते. अशारितीने योगाभ्यास, स्विमिंग, योग्य डाएट आणि व्यायाम यामुळं मी स्वत:ला फिट आणि मेंटेन ठेवू शकते."

बातम्या आणखी आहेत...