आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Interview:सचिन यांची मुलगी असल्यामुळे प्रेम मिळते, पण खरी परीक्षा माझ्या कामावरुनच!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन पिळगावकर यांची 'एकुलती एक' कन्या श्रिया पिळगावकर मराठीनंतर 'फॅन' या हिंदी चित्रपटात शाहरुखसोबत झळकली होती. आता श्रियाने पुन्हा हिंदीची वाट पकडली आहे आणि यावेळी ती अनुभव सिन्हा यांच्या 'अभी तो पार्टी शुरु हुई है' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती प्रतिक बब्बरबरोबर प्रथमच काम करत आहे. यावेळी आमच्या प्रतिनीधींनी तिच्याशी खास संवाद साधला आणि तिच्या या चित्रपटातील कामाबद्दल आणि कुटुंबियाबद्दलही काही गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. 

 

Q.1 प्रतिक बब्बरसोबत तुझे नाते कसे आहे? मैत्री झाली की नाही?
- "हो, मी आणि प्रतिक एकमेकांचे चांगले मित्र झालोत. इतकेच नव्हे आम्ही बऱ्याचदा मराठीत गप्पाही मारतो."

 

Q.2 फॅननंतर आता तु पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात झळकणार आहेस? आता बॉलिवूडवर फोकस करण्याचे ठरविले आहे का? 
- "खूप लोकांना असे वाटते की मला मराठी चित्रपटांत काम करायची इच्छा नाही. पण तसे अजिबात नाही. केवळ माझ्याच भाषेत मी मर्यादीत राहणार नाही. जर स्क्रिप्ट चांगली असेल तर मी साऊथ इंडियन चित्रपटांतही काम करण्यास उत्सुक आहे. भाषा माझा प्रोजेक्ट निवडण्याचा मार्ग नाही तर चांगली स्क्रिप्ट आहे. मी आता साईन लँग्वलेज शिकत आहे. त्यात चाहे तुम कुछ ना कहो हे गाणेही केले त्याची सबंध प्रोसेस मी खूप एन्जॉय केली. या गाण्यात साईन लँग्वेजचा वापर केला आहे."

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, वडील सचिन यांच्याबद्दल काय म्हणाली श्रिया...

बातम्या आणखी आहेत...