आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाचा या अभिनेत्रीला वाटतोय पश्चाताप, विशीत 32 वर्षांच्या अॅक्टरसोबत केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री रेशम टीपणीस लवकरच आगामी सिनेमा 'बकेलिस्ट'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरी दीक्षितचा पहिलाच मराठी सिनेमा असल्याकारणाने या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये फार उत्सुक्ता आहे. याच चित्रपटात रेशमचीही भूमिका आहे. माधुरीसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याने रेशम फारच आनंदात आहे. काही दिवसांपूर्वीच रेशमने माधुरीसोबतचा फोटो शेअर करुन या चित्रपटाच्या निमित्ताने तिला एक चांगली मैत्रीण भेटली असल्याचे सांगितले. रेशमचा झाला आहे घटस्फोट...

 

रेशम टीपणीस टीव्ही अभिनेता संजीव सेठसोबत 1993 रोजी लग्न केले होते. पण लग्नाच्या काही वर्षानंतर तिने पतीला घटस्फोट दिला. याबाबत बोलताना एका मुलाखतीत रेशम टीपणीसने सांगितले होते की, "आज तिला पतीला दिलेल्या घटस्फोटाचा पश्च्यात्ताप होतो. तिने सांगितले की, घटस्फोट घेण्याअगोदर थोडा समंजसपणे निर्णय घेतला असता तर चांगले झाले असते कारण आज मला त्या गोष्टीचा पश्च्यात्ताप होतो. आज मी माझा पूर्वपतीसोबत मैत्रीच्या नात्यात आहे आणि आमचा आजही एकमेकांशी संवाद सुरु असतो."

 

रेशमने पुढे सांगितले की, ती 20 वर्षांची होती जेव्हा तिने लग्न केले. त्यानंतर लगेचच ती आईही बनली. या सर्व गोष्टी सांभाळण्याची ताकद त्यावेळी माझ्यात नव्हती तर दुसरीकडे संजीव या सर्व गोष्टी सांभाळण्यास तयार होता. संजीव आणि रेशम यांच्यात 12 वर्षाचे अंतर आहे. 

रेशमचे पती संजीव सेठने घटस्फोटानंतर अभिनेत्री लता सबरवालसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत सोबत काम केले आहे. लताबद्दल बोलताना रेशमने सांगितले की, "आम्ही दोघी फार चांगल्या मैत्रीणी जरी नसलो तरी आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही एकमेकांसोबत अगोदर कामही केले आहे. माझ्या मुलांना ती खूप चांगल्याप्रकारे वागवते. संजीव आणि लता यांच्या नात्याने मी खूश आहे."

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, रेशम टीपणीसचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...