आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'नकळत सारे घडले'च्या सेटवर कलाकारांची आईसक्रीम पार्टी, शेअर केले फोटोज्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कडाक्याच्या उन्हानं जीवाची काहिली होत आहे, घामाघुम होऊन प्रचंड दमछाक होत आहे. रोजची कामं करायचाही कंटाळा येतो. मालिकेच्या सेटवर तर सतत कामाचा व्याप असतो. स्टार प्रवाहच्या 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या सेटवरील कलाकार-तंत्रज्ञांना आईसक्रीम पार्टीमुळे गारवा अनुभवण्याची संधी नुकतीच मिळाली.

 

स्टार प्रवाहच्या मालिकांच्या सेटवर अगदी कौटुंबिक वातावरण असतं. त्यामुळे इथं नेहमीच धमाल मस्ती सुरू असते. काही दिवसांपूर्वी 'लेक माझी लाडकी' मालिकेच्या सेटवर ऐश्वर्या नारकर यांनी नारळ्याच्या वड्या केल्या होत्या. तर, 'नकळत सारे घडले' या मालिकेच्या सेटवरही आईसक्रीम पार्टी रंगली. अख्ख्या युनिटसाठी अचानक आईसक्रीम मागवण्यात आलं. सगळ्या कलाकार-तंत्रज्ञांनी मिळून गारेगार आईस्क्रीमवर ताव मारला.

 

मालिकेत प्रतापची भूमिका साकारणारा हरीश दुधाडे या पार्टीविषयी म्हणाला, "आमच्या सेटवर आईसक्रीम, कोल्ड्रिंक पार्टी नेहमीच होत असते. अशा पार्टीमुळे सेटवरचं वातावरण छान राहातं.  आमच्या सेटवर एक गमतीशीर नियम आहे. शूटिंग सुरू असताना जर कोणाचा मोबाईल वाजला, तर त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखाने अख्ख्या युनिटला पार्टी द्यायची असते. हा नियम काटेकोरपणे पाळला जातो आणि अधूनमधून पार्टी मिळते."

बातम्या आणखी आहेत...