आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'यंग्राड'च्या Trailer रिलीजला पोहोचले सेलेब्स, जाणून घ्या काय आहे 'यंग्राड'चा अर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा आणि त्यांच्या आगळ्या हाताळणीच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच हटके चित्रपट घेऊन ते येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या चित्रपटातील कलाकारांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक मकरंद माने, विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सचे विठ्ठल पाटील, फ्युचरवर्क्स मिडिया लिमिटेडचे गौतम गुप्ता व गौरव गुप्ता आणि फँटम फिल्म्सचे मधु मंटेना उपस्थित होते. ‘यंग्राड’ चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्सने केली असून हा चित्रपट 6 जुलै 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 


काय आहे चित्रपटाची वनलाइन... 
‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून  येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.


पुढे वाचा, चित्रपटाविषयी आणखी बरंच काही आणि सोबतच बघा, ट्रेलर लाँचची क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...