आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पिंजरा'ची 46 वर्षे : ''मास्तर न्हायं तुमच्या हातात तुनतुन दिलं...'', हे आहेत गाजलेले Dialogues

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः व्ही. शांतारामनिर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट 'पिंजरा' म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड. संध्या आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाने सजलेल्या  या चित्रपटाच्या रिलीजला 31 मार्च रोजी 46 वर्षे पूर्ण होत आहेत. 31 मार्च 1972 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची जादू एवढ्या वर्षांनंतरही प्रेक्षकांवर कायम आहे.

 

दमदार संवाद...

‘पिंजरा’.. त्यो कुनाला चुकलाय? अवो मानसाचं घरतरी काय असतं? त्योबी एक पिंजराच की, हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि ‘व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या महान तत्त्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची कथा ‘पिंजरा’ चित्रपटात उत्कृष्टपणे मांडण्यात आली.  चंद्रकला आणि गुरुजी यांच्यावर चित्रीत झालेले प्रत्येक दृश्य आणि संवाद सिनेरसिकांच्या आजही लक्षात आहे. प्रत्येकाच्या मनःपटलावर पिंजरा कलाकृतींच एक वेगळंच स्थान आहे.

 

दोन वर्षांपूर्वी पुन्हा  प्रदर्शित करण्यात आला होता चित्रपट... 

डॉ. श्रीराम लागू, संध्या, नीळू फुले, वत्सला देशमुख यांच्या यांनी  आपल्या अभिनयाने हा चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला. 18 मार्च 2016 रोजी हा  चित्रपट नव्या रंगात अन् ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला आला. आधुनिक तांत्रिक प्रक्रिया करून अभिजात कला कृतीला आधुनिक साज चढवण्यात आला होता. 

 

चित्रपटाच्या रिलीजला 46 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत आम्ही या चित्रपटातील हृदयस्पर्शी संवादांचा खास खजिना वाचकांसाठी घेऊन आलो आहोत...

बातम्या आणखी आहेत...