आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss मराठीच्या ग्रॅण्ड फिनालेत स्पर्धक करणार परफॉर्म, रेशम-जुई-ऋतुजाने केली डान्स प्रॅक्टिस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संपूर्ण महाराष्ट्र काय तर जग ज्या दिवसाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत होता तो क्षण आला. अवघ्या एक  दिवसात प्रेक्षकांना कळणार बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा पहिला विजेता. GRAND FINALE म्हणजे धमाकेदार होणार यात वादच नाही. ज्या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी इतक्या जोशात झाली त्याची सांगता पण तशीच होणार हे तर नक्की. ग्रॅण्ड फिनालेची तयारी सुरु झाली असून बिग बॉस मराठीच्या घरामधून जे स्पर्धक बाहेर पडले ते देखील यामध्ये सहभागी असणार आहेत. अंतिम फेरीमध्ये 6 स्पर्धक पोहचले असून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. 


ग्रॅण्ड फिनालेसाठी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील 6 फायनलिस्टदेखील परफॉर्म करणार आहेत. ज्यामध्ये मेघा, शर्मिष्ठा, आस्ताद, स्मिता, पुष्कर, सई यांचे डान्स बघायला मिळणार आहेत. रेशम टिपणीस, जुई गडकरी, ऋतुजा, सुशांत शेलार, राजेश शृंगारपुरे यांची रिहर्सल सुरु झाली आहे. रेशम टिपणीस खल्लास आणि नागीन नागीन या गाण्यावर तर जुई–ऋतुजा आली रे आणि धाकड या गाण्यावर डान्स करणार आहेत. तेजस पुजारीने नृत्यदिग्दर्शन केले आहे.
पुढील स्लाईड्सवर बघा, रेशम, ऋतुजा आणि जुईची डान्स प्रॅक्टिस करतानाची छायाचित्रे... 
 

बातम्या आणखी आहेत...