आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: सिद्धार्थ-मितालीमध्ये आहे 5 वर्षांचे अंतर, जाणून घ्या या 5 कपलच्या वयातील फरक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा आज (14 जून) वाढदिवस असून त्याने वयाची 27 वर्षे पूर्ण केली आहेत. सिद्धार्थला त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मिताली मयेकर हिने रोमँटिक अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याचवर्षी व्हॅलेंटाइन डेला दोघांनी त्यांच्या प्रेमाची सार्वजनिकरित्या कबुली दिली. सिद्धार्थ आणि मिताली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करुन रिलेशनशिपची कबुली दिली होती. 

 

खरं तर यांनी एकमेकांवरचे प्रेम जाहीर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. पण काही यूजर्सना मात्र दोघांची जोडी आवडली नव्हती. अनेकांनी दोघांना त्यांच्या वयावरुन सोशल मीडियावर ट्रोल केले होते. काही यूजर्सनी इतक्या लहान मुलीला डेट करतोय का? हा प्रश्न त्याला विचारला होता. तर काहींनी तुझ्यासाठी रसिकाच चांगली होती, अशी कमेंट दिली होती. मितालीपूर्वी सिद्धार्थ माझ्या नव-याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. 


सिद्धार्थ-मितालीच्या वयात आहे 5 वर्षाचे अंतर...
14 जून 1991 रोजी पुण्यात जन्मलेला सिद्धार्थ 27 वर्षाचा आहे तर मिताली मयेकर 22 वर्षाची आहे. 11 सप्टेंबर 1996 ही मितालीची जन्मतारीख आहे. या दोघांमध्ये जवळजवळ 5 वर्षांचे अंतर आहे.  


आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीत सध्या रिलेशनशिपमध्ये असलेल्या सेलिब्रिटी कपलच्या वयातील नेमके अंतर किती आहे, याची खास माहिती देत आहोत. 'काहे दिया परदेस' फेम ऋषी सक्सेना आणि 'जय मल्हार' फेम इशा केसकर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. तर 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहे.

 

चला तर मग या दोन कपलसह आणखी कोणते सेलिब्रिटी रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांच्या वयात नेमके किती वर्षांचे अंतर आहे, जाणून घेऊयात, पुढील स्लाईड्सवर...

 

बातम्या आणखी आहेत...